Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

46 वर्षांनंतर आज उघडले पुरी जगन्नाथ मंदिराच्या रत्न भंडारचे कुलूप, रत्न-अलंकारांचे उघडेल रहस्य

Webdunia
गुरूवार, 18 जुलै 2024 (13:19 IST)
ओडिसा मधील पुरी स्थित भगवान जगन्नाथ मंदिराचे रत्न भंडार आज परत उघडले. हे रत्न भंडार अमूल्य निधींनी भरलेले आहे. यामध्ये मौल्यवान रत्न-आभूषण, दुर्लभ धातूंच्या मूर्ती, सोने-चांदीच्या मुद्रा, मुकुट व इतर अलंकार आहे.   
 
भुवनेश्वर : ओडिसा मधील पुरी स्थित भगवान जगन्नाथ मंदिराचे रत्न भंडार आज परत उघडले. हे रत्न भंडार अमूल्य निधींनी भरलेले आहे. यामध्ये मौल्यवान रत्न-आभूषण, दुर्लभ धातूंच्या मूर्ती, सोने-चांदीच्या मुद्रा, मुकुट व इतर अलंकार आहे. तसेच आतमधील कुलूप उघडल्यानंतर  पुन्हा दोन दिवसांसाठी बंद करण्यात आले होते. आज परत उघडण्यात आले.
 
तळघर उघडण्याच्या प्रक्रियापूर्वी सकाळी 8 वाजेपासून भक्तांसाठी दर्शन बंद करण्यात आले आहे. मंदिराच्या सुरक्षतेची जवाबदारी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) जवळ आहे. या तळघराला 46 वर्षानंतर दुरुस्तीसाठी उघण्यात आले आहे. 
 
रत्न भंडार मध्ये रत्न मोजताना एक गोष्ट समोर आली एक एक करून खजिन्याच्या निधींची माहिती लोकांसमोर आली आहे. तसेच रत्न भंडारची सर्व माहिती नोंद करण्यात येईल. भगवान जगन्नाथ यांच्या मंदिरामध्ये राजा- महाराजांनी आणि इतर श्रद्धाळुंकडून चढवलेले सोने-चांदीचे अलंकार आणि मुद्रांचे रत्नभांडार आहे.  
 
यापूर्वी 1978 मध्ये खजान्याचे रत्न आणि अलंकारांच्या मोजणीमध्ये 72 दिवस लागले होते. 1978 मध्ये रत्न भंडार मध्ये कमीतकमी 140 किलो सोने व दागिने होते. या दागिन्यांमध्ये किमती दगड होते. सोबतच कमीतकमी 256 किलो चांदीचे भांडी होती. 
 
रत्न भंडार उघडण्याचा शुभ मुहूर्त- 
रत्न भंडार कमेटी अनुसार गुरुवारी मंदिराचा खजाना उघडण्याचा शुभ मुहूर्त सकाळी 9:51 वाजता तर दुपारी 12:25 पर्यंत निघाला आहे.
 
भंडारचे दोन भाग-
मंदिराच्या आतील भागांमध्ये स्थित रत्न भंडारचे दोन भाग आहे. एक बाहेरील आणि एक आतील भंडार 
 
बाहेरील भागाला रथयात्रा सोबत वेगेवगेळ्या उत्सव-अनुष्ठानच्या मुहूर्तवर उघडले जाते. व दागिने काढून भगवान जगन्नाथ यांना सजवले जाते.
 
आतील भागामध्ये मौल्यवान निधी आहे. सरकारकडून बनवल्या गेलेल्या समितीचे अध्यक्ष विश्वनाथ रथ अनुसार रत्न भंडार मध्ये अलंकारांसोबत कीमती धातूंच्या मुर्त्या आहे. यामध्ये काही छोटी तर काही मोठी आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

Mesh Rashi Varshik Rashifal 2025 in Marathi : मेष रास 2025 राशिभविष्य: नवीन वर्ष कसे असेल, निश्चित उपाय जाणून घ्या

26 नोव्हेंबरपासून बुध दोषामुळे त्रास होईल, या क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होईल !

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

पुढील लेख
Show comments