Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

लिंगबदल्यानंतर यांनी घेतला लग्नाचा निर्णय

Webdunia
पुरूषाच्या शरीरामध्ये एक महिला अडकलेली होती, तर महिलेच्या शरीरामध्ये होता एक पुरूष. लिंगबदलासाठी तीन वर्षांपूर्वी दोघे मुंबईत आले असताना एकमेकांना भेटले आणि या भेटीचे रूपांतर प्रेमात झाले. प्रेमाने पुढची पायरी गाठली असून पुढील महिन्यात दोघे विवाहबंधनात अडकणार आहेत.
46 वयाचा आरव अपुकुट्टन याचा जन्म महिला म्हणून झाला व तिचे नाव होते बिंदू. 22 वर्षीय सुकन्या कृष्णन या आताच्या मुलीचा जन्म पुरूष म्हणून झाला नी त्याचे नाव होते चंदू. मुंबईतल्या हॉस्पिटलमध्ये लिंगबदलासाठी दोघे आले आणि तिथेच त्यांची गाठ पडली. लिंगबदलाची प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली असून आरव व सुकन्या सप्टेंबरमध्ये लग्न करणार आहेत. सुकन्याने एक आठवण सांगितली, मी एका नातेवाईकाशी फोनवर मल्याळीमध्ये बोलत होते. माझे बोलणे संपल्यावर लक्षा‍त आले की माझ्या बाजूला आरव फोनवर कुणारीतरी मल्याळीत बोलत होता. त्याचा फोन झाल्यावर तो माझ्याकडे आला आणि त्याने तू केरळमधून आलीस का विचारले. तिथून आमचे बोलणे सुरू झाले. डॉक्टरांच्या अपॉइंटमेंटसाठी तीन तासाचा वेळ लागला आणि हा वेळ दोघांना एकमेकांना जाणून घ्यायला पुरेसा ठरला.
 
त्यांनतर फोन नंबरची अदलाबदल झाली आणि दोघांच्या गप्पा वरचेवर व्हायला लाग्लया. आरव केरळला परत गेला तर सुकन्या नोकरीनिमित्त बेंगळूरला गेली. नंतर दोघांनी शस्त्रक्रिया आणि एकूण ट्रीटमेंटबद्दल एकमेकांशी सविस्तर चर्चा केली. हळूहळू दोघांमधला संवाद वाढायला लागला, नंतर नंतर तर आम्ही रोजच एकमेकांशी फोनवर बोलायला लागलो, सुकन्याने सांगितले.
 
एकच भाषा आणि एकाच अनुभवातून दोघेही गेलेले असल्यामुळे दोघांची पटकन मैत्री झाली जिचे रूपांतर पुढे प्रेमात झाले. काही महिन्यांनंतर दोघे पुन्हा मुंबईतल्या हॉस्पिटमध्ये भेटले. आता आम्ही मंदिरामध्ये लग्न करण्याचा विचार करत असल्याचे आरवने सांगितले. दोन्ही कुटुंबांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळ्याल्याचेही त्यांनी सांगितले असून मूल दत्त घेणार असल्याचा विचारही त्यांनी व्यक्त केला.

संबंधित माहिती

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

पुढील लेख