Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शहीद हेमंत करकरे यांच्या बद्दल अपशब्द ‘आयपीएस असोसिएशन’ने प्रज्ञा ठाकूर यांच्या या वक्तव्याचा निषेध

Webdunia
शनिवार, 20 एप्रिल 2019 (07:08 IST)
मुंबईत ताज हॉटेलसह अनेक ठिकाणी हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण आलेल्या हेमंत करकरे यांच्यावरील अपमानास्पद वक्तव्याचा देशभरातून निषेध होतो आहे. मालेगाव येथे  बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी असलेल्या प्रज्ञासिंह ठाकूर यांनी करकरे यांची तुलना थेट कंसाशी केली आहे. सोबतच त्यांच्या मृत्यूबद्दल आनंद व्यक्त केला. त्यामुळे  राजकीय नेत्यांसह नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. देशातील सनदी पोलीस अधिकाऱ्यांची संघटना असलेल्या ‘आयपीएस असोसिएशन’ने प्रज्ञा ठाकूर यांच्या या वक्तव्याचा निषेध केला आहे. यामध्ये ते म्हणतात की ‘अशोक चक्र विजेत्या हेमंद करकरे यांनी दहशतवाद्यांशी लढताना सर्वोच्च बलिदान दिले. आम्ही सर्व अधिकारी निवडणूक उमेदवाराकडून केलेल्या या अपमानास्पद वक्तव्याचा निषेध करतो. तसेच शहीदांच्या बलिदानाचा सन्मान करण्याची मागणी करतो. या सर्व प्रकारामुळे भाजपवर जोरदार टीका होत आहे. सोबतच अनेक सेलेब्रिटी आणि नागरिक विचारत आहेत की प्रज्ञासिंह ठाकूरला का आणि कोणत्या कारणाने भाजपाने उमेदवारी दिली आहे.
 

संबंधित माहिती

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

पुढील लेख
Show comments