Marathi Biodata Maker

सावळ्या मुलाला गोरे करण्यासाठी चक्क दगडाने घासले

Webdunia
मंगळवार, 3 एप्रिल 2018 (09:12 IST)
मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये  एक महिलेने तिच्या पाच वर्षांच्या सावळ्या मुलाला गोरं करण्यासाठी त्याला चक्क दगडाने घासल असल्याचा प्रकार समोर आला आहे. सुधा तिवारी असं आरोपी महिलेचं नाव असून तिने मुलाला दत्तक घेतलं होतं. गोरं करण्यासाठी महिला त्याचं शरीर दगडाने घासत होती, अशी माहिती चाईल्ड लाईनला मिळाली होती. त्यानंतर पोलिस आणि लाईल्ड लाईनने या मुलाची सुटका केली. महिलेच्या मोठ्या बहिणीच्या मुलीने ही माहिती चाईल्ड लाईनला दिली होती.

आरोपी महिलेने उत्तराखंडच्या मातृछायामधून दीड वर्षांपूर्वी या मुलाला दत्तक घेतलं होतं. आरोपी सुधा तिवारी व्यवसायाने शिक्षिका असून ती सरकारी शाळेत शिकवते. तर महिलेचा पती खासगी रुग्णालयात काम करतो, असं तक्रारदार शोभना शर्माने सांगितलं.

शोमना शर्मा म्हणाल्या की, "सुधाने ज्या दिवसापासून मुलाला भोपाळमध्ये आणलं, त्यादिवसापासून तिला त्याचा सावळा रंग पटत नव्हता. तिने मुलावर खूप उपचार केले. सुमारे एक वर्षापूर्वी कोणीतरी तिला सल्ला दिला की, मुलाला काळ्या रंगाच्या दगडाने घासलं तर तो गोरा होऊ शकतो. यानंतर महिलेने मुलाचं शरीर काळ्या रंगाच्या दगडाने घासायला सुरुवात केली. पण यामुळे मुलाच्या मनगट, खांदा, पाठ आणि पायांना जखम झाली आहे." 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Weekly Rashifal : साप्ताहिक राशिफल 18 ते 24 जानेवारी 2026

ऑफिसमध्ये जाणाऱ्या महिलांनी हे स्किन केअर रूटीन टिप्स अवलंबवा

"जर तुम्ही कधी भांडलाच नसाल, तर तुम्ही पती-पत्नी नाही..."

हिडन जेम ऑफ महाराष्ट्र – टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य

उपमन्युकृतं शिवस्तोत्रम्- Upamanyukrutam Shivastotram

पुढील लेख
Show comments