Marathi Biodata Maker

बिहारमध्ये महापूर, 56 जणांचा बळी

Webdunia
बिहारमध्ये आलेल्या महापुरात आतापर्यंत 56 जणांचा बळी घेतला आहे. बिहारच्या 38 पैकी 13 जिल्ह्यातील जवळपास 70 लाख नागरिकांना त्याचा फटका बसला आहे. नेपाळमधून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे बिहारमध्ये ही स्थिती निर्माण झाली आहे. पुराचा सर्वात मोठा तडाखा कटिहार जिल्ह्याला बसला असून, तिथं लष्कराच्या तीन तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. याशिवाय दरभंगा, किशनगंज, अरिरिया, पूर्णिया, मधेपुरासह अनेक जिल्ह्यांना या पुराची झळ पोहोचली आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पूरग्रस्त दरभंगा परिसराची हवाई पाहणी केली.
 
पूरस्थितीमुळे 13 जिल्ह्यातील 2 लाख 48 हजार 140 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. बचावकार्यासाठी लष्कराची मदत घेण्यात येत आहे. हे बचावकार्य युद्धपातळीवर सुरु आहे.  एनडीआरएफची 22 पथकं कार्यरत आहेत. यामध्ये 949 जवान, 100 बोटी, याशिवाय एसडीआरएफच्या 15 टीम- यामध्ये 421 जवान, 82 नौका, तसंच सैन्यदलाच्या चार तुकड्या यामध्ये 300 जवान आणि 40 बोटींचा समावेश आहे.याशिवाय वायूसेनेच्या दोन हेलिकॉप्टरच्या माध्यमातून पूरग्रस्त भागात खाद्यान्न पुरवलं जात आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

ताकाचे 5 वेगवेगळे प्रकार (डायटसाठी बेस्ट)

कल्की अवतार आणि तिसरे महायुद्ध: या दोन्हींमध्ये काही संबंध आहे का? या प्रमुख घटना केव्हा आणि कशा घडतील?

लग्नाआधी हे प्रश्न नक्की विचारा, नाहीतर आयुष्यभर पश्चात्ताप होऊ शकतो!

उन्हाळ्यात तुळशीची काळजी कशी घ्यावी?

१९ ते २५ एप्रिल २०२६ चे साप्ताहिक राशीभविष्य

पुढील लेख
Show comments