Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मेगा भरतीवर पुन्हा एकदा ब्रेक, मराठा आरक्षण निर्णय झाल्यावर निर्णय - हायकोर्ट

mega bharti
Webdunia
मुंबई : मराठा आरक्षणासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर पुढील सुनावणी 23 जानेवारीला होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयात अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी दाखल केलेल्या याचिकेवर बुधवारी सुनावणी झाली. यावेळी राज्य सरकारकडून उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले आहे. या याचिकेत  मराठा आरक्षणाअंतर्गत नेमणुका करण्यात येऊ नये अशी मागणी देखील याचिकाकर्त्यांकडून करण्यात आली होती. त्यासंदर्भात राज्य सरकारने आज उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. यामध्ये मेगा भरतीची प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नाही तर दुसरीकडे न्यायालयाने पुढील निर्णय दिल्याशिवाय मराठा आरक्षणाखाली कोणतीही नेमणूक करण्यात येणार नाही.  
 
मराठा आरक्षणाचा मुद्दा वगळता मेगा भरतीच्या प्रक्रियेला कोणताही अडथळा नसल्याचे यावेळी स्पष्ट  केले आहे. येत्या  आठवड्यात मराठा आरक्षणासंदर्भात राज्य मागासवर्ग आयोगाच्या संपूर्ण अहवालाची प्रत सीलबंद स्वरूपात देण्यात येणार आहे.  याचिकादार व प्रतिवादींना पूर्णपणे न देता, गैरलागू भाग वगळून अंशतः देता येईल, असे स्पष्ट केले आहे. सरकारने 50 टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण देणे घटनाबाह्य असल्याचे सांगत अॅड. गुणरत्न सदावर्ते  यांनी याचिका दाखल केली असून आरक्षण रद्द करण्याची मागणी याचिकेद्वारे करण्यात आली आहे. त्यामुळे या याचिकेकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या 5 जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे डोकेदुखी होते, जाणून घ्या उपाय

Natural Cool Water उन्हाळ्यात फ्रीज न वापरता थंड पाणी मिळवा, कसे ते जाणून घ्या

झोपेची समस्या दूर करण्यासाठी या योगासनांचा सराव करा

जातक कथा : दयाळू मासा

स्वप्नात हे पक्षी दिसणे खूप शुभ मानले जाते, जाणून घ्या

पुढील लेख
Show comments