Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सीबीएससी बोर्ड: दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

Webdunia
गुरूवार, 11 जानेवारी 2018 (09:35 IST)
सीबीएससी बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर झालं आहे. दहावी आणि बारावी या दोन्ही वर्षांच्या परीक्षा 5 मार्चपासून सुरु होणार आहेत. दहावीची परीक्षा 5 मार्चला सुरु होणार असून 4 एप्रिला संपणार आहे, तर बारावीची परीक्षा 5 मार्चला सुरु होऊन 12 एप्रिलपर्यंत चालणार आहे. सीबीएसईच्या अधिकृत संकेतस्थळावर दोन्ही परीक्षांचं वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आलं आहे.

 

दहावीला 16 लाख 38 हजार 552 विद्यार्थी बसले आहेत, तर 11 लाख 86 हजार 144 विद्यार्थी बारावीची परीक्षा देणार आहेत. माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञान (इन्फर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी) हा दहावीचा पहिला पेपर आहे, तर बारावीचा पहिला पेपर इंग्रजी विषयाचा आहे.
सीबीएसईच्या नियमांनुसार जानेवारी महिन्याच्या मध्यापासून सीबीएसई संलग्न शाळांमध्ये प्रयोग परीक्षांना सुरुवात होईल, त्या 31 जानेवारीपर्यंत पूर्ण करण्यात येतील.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

पुढील लेख
Show comments