Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ख्रिश्चन धर्मगुरु फादर टॉम यांची सुटका

Webdunia
मंगळवार, 12 सप्टेंबर 2017 (17:16 IST)

इसिसच्या तावडीतून अखेर ख्रिश्चन धर्मगुरु फादर टॉम यांची सुटका झाली आहे. फादर टॉम भारतीय नागरीक आहेत.  वर्षभरापूर्वी 2016 मध्ये येमेनच्या दक्षिणेकडील अदेन शहरातून इसिसने  त्यांचे अपहरण केले होते. फादर टॉम यांच्या सुटकेसाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न सुरु होते. जवळपास 18 महिने फादर टॉम इसिसच्या तावडीत होते. 

मार्च 2016 मध्ये चार बंदुकधारी दहशतवाद्यांनी सेवा केंद्रावर हल्ला करुन फादर टॉम यांचे अपहरण केले होते. काही महिन्यांपूर्वी फादर टॉम यांचा एक व्हिडीओ येमेनी वेबसाईटने प्रसिद्ध केला होता. दरम्यान,  परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी सुद्धा टॉम यांच्या सुटकेबद्दल आनंद व्यक्त केला आहे. 

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

पुढील लेख
Show comments