Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Delhi Mundka Fire:मुख्यमंत्री केजरीवाल मुंडका येथे पोहोचले, 10 लाख नुकसान भरपाईची घोषणा

Webdunia
शनिवार, 14 मे 2022 (13:24 IST)
दिल्लीतील मुंडका येथील मेट्रो स्टेशनजवळील एका इमारतीला लागलेल्या भीषण आगीत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना दिल्ली सरकारने प्रत्येकी 10 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी शनिवारी सकाळी घटनास्थळी पोहोचून सद्यस्थितीचा आढावा घेतला. 
 
दरम्यान, सीएम केजरीवाल म्हणाले की, मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 10 लाख रुपयांची भरपाई दिली जाईल. यासोबतच सर्व जखमींना 50-50 हजार रुपये देण्यात येणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी दंडाधिकारी चौकशीचे आदेश दिले आणि या प्रकरणात दोषी आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल असे सांगितले.
 
दिल्लीतील मुंडका येथील मेट्रो स्टेशनजवळील एका इमारतीला शुक्रवारी रात्री लागलेल्या आगीत 27 जणांचा होरपळून मृत्यू झाला होता, तर अनेक जण गंभीर जखमी झाले होते. आग आटोक्यात आणण्यासाठी ३० हून अधिक अग्निशमन दलाच्या गाड्या लावण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.मिळालेल्या माहितीनुसार, ही इमारत 4 मजली असून तिचा वापर कंपन्यांना कार्यालयासाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी केला जातो. 
या बाबत जेडीयू नेते उपेंद्र कुशवाहा यांनी कू वर पोस्ट करून आपल्या संवेदना मृतकांसाठी व्यक्त केल्या आहेत. देवा मृतकांना सदगती प्रदान करो. 

या घटनेतील आतापर्यंत 27 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून 29 जण अद्याप बेपत्ता असल्याचे सांगितले जात आहे. कंपनीचे मालक - हरीश गोयल आणि वरुण गोयल यांना अटक करण्यात आली असून इमारतीचा मालक अद्याप फरार आहे. इमारतीच्या मालकाचे नाव मनीष लाकरा असे आहे, तो त्याच इमारतीच्या वरच्या मजल्यावर राहत होता आणि त्याच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
अग्निशमन दलासह एनडीआरएफची टीम बचाव कार्यात गुंतली आहे. अजूनही काही लोक आत अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

Mesh Rashi Varshik Rashifal 2025 in Marathi : मेष रास 2025 राशिभविष्य: नवीन वर्ष कसे असेल, निश्चित उपाय जाणून घ्या

26 नोव्हेंबरपासून बुध दोषामुळे त्रास होईल, या क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होईल !

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

पुढील लेख
Show comments