Dharma Sangrah

अबब रुग्णाच्या पोटातून पाच किलो 'साहित्य' काढले

Webdunia

मध्यप्रदेशातील एका  शस्त्रक्रियेत रुग्णाच्या पोटातून दाढी करायच्या ब्लेडची पाती, काचा, साखळी, असे 5 किलो वजनाचे लोखंड काढण्यात आले आहे.   सतना जिल्ह्यातील सोहोवाल गावातील 32 वर्षांच्या महंमद मकसूद नावाच्या रुग्णाच्या पोटात असह्य वेदना सुरू झाल्या. त्यामुळे त्याला शेजारच्या रेवा जिल्ह्यात उपचारासाठी पाठवण्यात आले. रेवा जिल्ह्यातील संजय गांधी रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय येथे त्याला तपासणीसाठी आणल्यावर डॉक्टर प्रियांक शर्मा यांनी त्याच्या तपासणी केली व एक्स-रे काढले. त्यानंतर डॉ. शर्मा यांच्यासह सहा डॉक्टरांच्या चमूने त्याच्यावर शस्त्रक्रिया केली. या रुग्णाच्या पोटात 263 नाणी, काचा, दाढीची ब्लेड्स, साखळी असे पाच किलो 'साहित्य' सापडले.

डॉ. शर्मा यांच्या मते या रुग्णाची मानसिक स्थिती नीट नव्हती, या वस्तू त्याने कुणाचेही लक्ष नसताना गुपचूप गिळंकृत केल्या आहेत. रेवाला आणण्यापूर्वी त्याच्यावर सतना येथे सहा महिने उपचार झाले होते पण तेथे त्याच्या प्रकृतीला आराम मिळाला नव्हता.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Morning Mantras सकाळी उठल्यावर या 4 मंत्रांचा उच्चार करा, सर्व अडचणी दूर होतील

उत्तम करिअर घडवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

तुळशीचे झाड काळे पडत आहे का? हे कारण असू शकते का? प्रतिबंधात्मक टिप्स जाणून घ्या

साप्ताहिक राशिफल 04 ते 10 जानेवारी 2026

मकरसंक्रांती रेसिपी : सोपी तीळ-गुळाची बर्फी

पुढील लेख
Show comments