Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

रामलीला दरम्यान, 'दशरथ'ची भूमिका साकारणाऱ्या कलाकाराचा मृत्यू , लोक अभिनयसमजून टाळ्या वाजवत राहिले

Webdunia
रविवार, 17 ऑक्टोबर 2021 (15:50 IST)
बिजनौरमध्ये सप्तमी ते दसऱ्यापर्यंत रामलीला आयोजित केली जाते. रामायणातील पात्रे स्थानिक लोक साकारतात. यामध्ये गावाचे माजी प्रमुख राजेंद्रसिंह हे बराच काळापासून दशरथची भूमिका साकारत होते.
 
रामलीलाच्या मंचावर, रामच्या 14 वर्षांच्या वनवासातील प्रसंग सुरु होते.दु: खी मनाने मंचावर दशरथच्या भूमिकेत राजेंद्र संवाद बोलत असताना त्यांना  हृदयविकाराचा झटका आला. परिणामी, त्यांच्या मंचावरच मृत्यू झाला.
 
रामलीलाच्या मंचावर सिंहासनावर बसलेले, दशरथची भूमिका साकारणारे राजेंद्र सिंह, हातात माईक घेऊन संवाद बोलत असताना  अचानक ते मंचावर कोसळले , संवाद ऐकून प्रेक्षक देखील भावनिक झाले, त्यांना वाटले की ते त्यांच्या अभिनयाचाच एक भाग आहे आणि प्रेक्षकांनी टाळ्या वाजवण्यास सुरुवात केली. दरम्यान, रंगमंचाचा पडदा पडतो आणि काही काळानंतर प्रेक्षकांना कळते की रामलीलातील   दशरथने प्रत्यक्षात जगाला निरोप दिला आहे.
 
ही चित्रे बिजनौर जिल्ह्यातील रेहाड पोलीस स्टेशन परिसरातील हसनपूर गावात आयोजित केलेल्या रामलीलाची आहेत. रामलीलाच्या मंचावर भगवान रामांना 14 वर्षांसाठी वनवास झाला तेव्हा राजा दशरथ अस्वस्थ झाले. राजा दशरथाने आपले महान मंत्री सुमंत यांना या उद्देशाने भगवान रामसोबत जंगलात पाठवले होते की ते जंगलात फिरून रामाला परत आणतील, पण रामजी जंगलात थांबले आणि त्यांनी मंत्री सुमंत यांना परत पाठवले.
 
सुमंत राजा दशरथाकडे परत आल्यावर राजा दशरथ रामाला न पाहताच भावुक होतात. राजा दशरथची भूमिका साकारणारे राजेंद्र खाली पडले आणि त्यांचा मृत्यू झाला. मंचाचा पडदा पडला .राजेंद्रचे सहकारी कलाकार त्यांना जागे करण्याचा  प्रयत्न करतात, परंतु 20 वर्षांपासून दशरथची भूमिका साकारणारे राजेंद्र सिंह मरण पावले होते.संपूर्ण वातावरणात शोककळा पसरली.या घटनेमुळे रामलीलातील पुढील प्रसंगें पुढे रद्द करण्यात येते. अभिनयाच्या दरम्यान, मृत्यूचा हा लाईव्ह  व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
 

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

पुढील लेख
Show comments