Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मदुराई : कोरोनाच्या धास्तीनं कुटुंबाची आत्महत्या

Webdunia
सोमवार, 10 जानेवारी 2022 (14:11 IST)
कोरोना महामारीच्या भीतीने तामिळनाडूतील संपूर्ण कुटुंबाने आत्महत्येचा प्रयत्न केला. मदुराईमधील कलमेडूजवळील एमजीआर कॉलनीत राहणाऱ्या लक्ष्मी (४५) यांनी तिचा मुलगा, मुलगी आणि नातवासोबत आत्महत्येचा प्रयत्न केला.
 
नकारात्मक परिस्थितीत माणून किती असहाय्य असू शकतो, ही घटना त्याचा जिवंत पुरावा आहे. हे धक्कादायक प्रकरण लक्ष्मीची मोठी मुलगी ज्योतिका हिच्या कोरोना संसर्ग आणि त्यानंतरच्या भयानक दृश्याबाबत आहे. ही घटना इतकी भीषण आहे की, आईच्या प्रेमालाही आपल्या जिवाची पर्वा नाही, मुलांच्या जीवाची पर्वाही केली नाही.
 
आत्महत्येचा प्रयत्न, दोघांचा जागीच मृत्यू, मिळालेल्या
माहितीनुसार, ज्योतिकाला ८ जानेवारीला कोरोनाची लागण झाली होती. लक्ष्मी, ज्योतिका (२३), ज्योतिका यांचा ३ वर्षांचा मुलगा रितेश आणि लक्ष्मीचा मुलगा सिबराज (१३) यांनी संपूर्ण कुटुंबात कोरोनाचा संसर्ग पसरण्याच्या भीतीने शेणाची पावडर प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. यात ज्योतिका आणि रितेश यांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य दोघे गंभीर आजारी आहेत. दोघांनाही गंभीर अवस्थेत मदुराईच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पुण्यात झिका व्हायरसचे दोन रुग्ण आढळले

विधानसभा निवडणुकीपूर्वी तुतारी निवडणूक चिन्ह रद्द करण्याची शरद पवार गटाची निवडणूक आयोगाकडे मागणी

आंदोलकांनी केनियाच्या संसदेला आग लावली,भारताने आपल्या नागरिकांसाठी एक ॲडव्हायजरी जारी केली

ओम बिर्ला यांची लोकसभा अध्यक्षपदी, मोदी-राहुल गांधींनी सोबत जाऊन केलं अभिनंदन

अरविंद केजरीवाल यांना सीबीआयकडून अटक

पुढील लेख