Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आमदार अब्दुल सत्तार यांच्याविरोधात गुन्हा दाखल

Webdunia
गुरूवार, 15 जून 2017 (11:57 IST)

शेतकऱ्याला धमकी देऊन मारहाण केल्याप्रकरणी काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. अब्दुल सत्तार यांच्यासह इतर 32 जणांविरोधातही गुन्हा दाखल झाला आहे. औरंगाबादमधील सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केली आहे. अब्दुल सत्तार औरंगाबादमधील सिल्लोडचे आमदार आहेत. सिल्लोडमधील एका शेतकऱ्याला शेतात जाऊन मारहाण केल्याचा आरोप त्या शेतकऱ्याने केला होता. त्यानुसार सत्तार यांच्यावर ही कारवाई झाली आहे. अब्दुल सत्तार यांनी त्यांच्याच मतदारसंघातील शेतकऱ्याला शेतात जाऊन धक्काबुक्की केल्याचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे. 12 जून रोजी ही घटना घडली होती.  व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये अब्दुल सत्तार त्यांच्यासोबत असलेला पोलीस कर्मचारी आणि कार्यकर्ते शेतात घेऊन गेलेले दिसत आहेत. 

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

पुढील लेख
Show comments