Marathi Biodata Maker

जयपूर मध्ये चालत्या बसने पेट घेतला, सर्व 30 प्रवासी सुखरूप

Webdunia
बुधवार, 17 सप्टेंबर 2025 (13:10 IST)
जयपूरमध्ये मोठा अपघात टळला आहे. जयपूरहून 30 प्रवाशांना निवाईला जाणाऱ्या रोडवेजच्या बसने चैनपुरा क्रॉसिंगवर अचानक पेट घेतला. या मुळे प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला.
ALSO READ: पुरीच्या प्रसिद्ध समुद्रकिनाऱ्यावर प्रियकराच्या समोर मुलीवर सामूहिक बलात्कार, तीन आरोपी अटक
आगीची माहिती मिळतातच पोलीस अधिकारी आणि पथक  घटनास्थळी पोहोचले आणि सर्व प्रवाशांना बसमधून बाहेर काढले आणि अग्निशमनदलाला माहिती दिली. अग्निशमनदलाचे बंब येण्यापूर्वीच क्रॉसिंगवरील पाण्याची टाकी आणि ट्यूबवेलचा वापर करून रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांनी आग विझवून आटोक्यात आणले.
 ALSO READ: ऑनलाइन गेममध्ये १३ वर्षीय मुलाने १४ लाख गमावले, वडिलांच्या भीतीने गळफास घेतला
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी संध्याकाळी 6:30 वाजेच्या सुमारास जयपूरहून टोंकच्या निवाई मार्गे  कोट्याला जाणाऱ्या रोडवेजच्या बस मध्ये चैनपुरा क्रॉसिंगवर वायरिंगमध्ये शॉटसर्किट झाल्यामुळे आग लागली.
ALSO READ: मद्यधुंद ट्रक चालकाचा बेफाम तांडव, एक किलोमीटरपर्यंत लोकांना आणि वाहनांना चिरडत राहिला
बसमधील प्रवासी घाबरून ओरडू लागले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून बसमधील प्रवाशी आणि बसच्या चालक आणि वाहकाला सुखरूप बाहेर काढले. या घटनेमुळे वाहतूक कोंडी झाली. बसला क्रेनच्या साहाय्याने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. पोलीस घटनेचा तपास करत आहे.  
Edited By - Priya Dixit
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

पुढील लेख
Show comments