उत्तर प्रदेशातील नोएडा येथे बुधवारी दुपारी एका इमारतीला आग लागली. ही घटना सेक्टर 18 मधील बाजारपेठेची आहे. आगीत अनेक लोक अडकले असून त्यांना अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूप बाहेर काढले आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या. आग आटोक्यात आणण्यात आली आहे. यात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
<
Uttar Pradesh | A fire broke out in a building in Sector-18 market in Noida. Four fire tenders at the spot pic.twitter.com/PDeNBHzNN2
मुख्य अग्निशमन अधिकारी अर्जुन सिंह यांनी सांगितले की, सेक्टर 18 मार्केटमध्ये असलेल्या इमारतीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर सुमारे 12 लोक आगीत अडकले होते. सर्वांना सुखरूप बाहेर काढण्यात आले असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आग आटोक्यात आणण्यात आली आहे. , मात्र आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.