rashifal-2026

चाणक्य माशाने ट्रम्प यांच्या विजयाची शक्यता वर्तवली

Webdunia
अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीची उत्कंठा आता शिगेला पोहोचली आहे. एकीकडे सट्टाबाजार जोरात सुरु झाला आहे. तर पारंपारिक पद्धतीने प्राण्यांच्या मदतीने कौल घेतले जात आहेत. यात चेन्नईतील चाणक्य माशाने डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाची शक्यता वर्तवली आहे. तर चीनमध्येही एका माकडाने डोनाल्ड ट्रम्प यांना कौल दिला आहे. 
 
माशांच्या टँकमध्ये दोनबाजूला डोनाल्ड ट्रम्प आणि हिलरी क्लिंटन यांचे दोन फोटो व बोटीची छोटी प्रतिकृती होती.  यावेळी चाणक्यला खाद्य घातल्यानंतर त्याने डोनाल्ड ट्रम्प यांच्या बोटीजवळचे खाद्य वेचले. सातवेळा चाणक्यने ट्रम्प यांच्या फोटोजवळच्या खाद्यांची निवड केली. तर चीनमध्येही एका माकडाने डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे पुढचे राष्ट्राध्यक्ष होतील अशी भविष्यवाणी केली आहे. या माकडासमोर ट्रम्प आणि हिलरी क्लिंटनचे दोन मोठे पोस्टर ठेवण्यात आले होते. त्याने ट्रम्प यांच्या फोटोची निवड केली.  
सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल २५ ते ३१ जानेवारी २०२६

गणपतीची आरती सुखकर्ता दुःखहर्ता Sukhkarta Dukhharta

हिवाळ्यात दररोज रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा हा चहा प्या; लिहून घ्या रेसिपी

हिवाळ्यात पनीर का खावे? आरोग्यासाठी काय फायदे आहे, जाणून घ्या

27 वर्षांनंतर शनीचे नक्षत्र परिवर्तन : 17 मे पर्यंत कोणत्या राशींना होणार मोठे लाभ आणि कोणाला होणार नुकसान?

पुढील लेख
Show comments