Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आपणही आहात TikTok फॅन तर ही बातमी नक्की वाचा

Webdunia
सोमवार, 15 एप्रिल 2019 (18:25 IST)
जर आपण देखील TikTok वर व्हिडिओ बनविण्यास इच्छुक असता आणि या साठी विविध प्रकारचे कृत्य करता तर ही बातमी आपल्यासाठीच आहे. दिल्लीमध्ये एक धक्कादायक प्रकरण घडले आहे. येथे 19 वर्षांच्या एका माणसाने आपल्या मित्राची गोळी मारून हत्या केली. ही घटना तेव्हा घडली जेव्हा ते मोबाइल अॅप TikTok साठी व्हिडिओ बनवत होते.
 
पोलिसांनुसार रविवारी रात्री सलमान आपले मित्र सोहेल आणि आमिर यांच्याबरोबर कारमध्ये इंडिया गेट गेला होता. परत येत असताना गाडी चालवणाऱ्या सलमानच्या शेजारी बसलेल्या सोहेल ने एक देशी पिस्तूल काढली आणि व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करताना सलमान वर निशाना लावला पण पिस्तुलाने निघालेली गोळी त्याच्या डाव्या गालावर लागली.
 
पोलिसांनी सांगितले की आमिर क्रेटा कारच्या मागच्या सीटवर बसला होता. ही घटना मध्य दिल्लीच्या बाराखंबा रोडशी लागलेल्या रणजीत सिंह फ्लायओव्हरजवळ घडली. पोलिसांनी हे देखील सांगितले की घटनेनंतर दोन्ही मित्र घाबरले आणि दारियागंजमध्ये सोहेलच्या नातेवाइकांच्या घरी जाऊन रक्तरंजित कपडे बदलले. मग नातेवाइकांसह त्यांनी सलमानला जवळच्या एलएनजेपी हॉस्पिटलमध्ये नेले, तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. बाराखंबा रोड पोलिसाने आर्म्स एक्ट अंतर्गत खून प्रकरणात नोंदणी केली आहे. या प्रकरणात पोलिसांनी आमिर, सोहेल आणि अन्य एक शरीफला अटक केली आहे. 

संबंधित माहिती

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

पुढील लेख
Show comments