Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

'पाटणा-इंदूर एक्सप्रेस' घसरली 133 जणांचा मृत्यू

Webdunia
सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 (11:07 IST)
पाटणा-इंदूर एक्स्प्रेसचे चौदा डब्बे रुळावरुन घसरुन झालेल्या अपघातात नुकत्याच प्राप्त झालेल्या माहितीनुसार 133 जणांचा मृत्यू झाला असल्याचे समजते. तसेच 200 पेक्षा अधिकजण जखमी झाले आहेत. दरम्यान, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता अजूनही वर्तवण्यात येत आहे.
 
पहाटे साडे चारच्या सुमारास उत्तर प्रदेशातील कानपूरच्या पुखराया रेल्वे स्टेशनजवळ ही दुर्घटना घडली. रेल्वे रुळ उखडल्यामुळे हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.
 
अपघातानंतर परिसरातील नागरिक, पोलीस प्रशासन यांच्याकडून बचावकार्य सूरू आहे. घटनास्थळी मेडिकल टीम दाखल झालेली आहे. थोड्याच एनडीआरएफची टीमही लवकरच दाखल होणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
 
दोषींना सोडणार नाही 
पाटणा-इंदूर एक्सप्रेसला झालेल्या भीषण अपघाताच्या चौकशीचे आदेश प्रभू यांनी दिले आहेत. चौकशीत दोषी आढळलेल्यांना सोडणार नाही. त्यांच्यावर कठोर करावाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी घटनास्थळी दाखल होऊन मदत कार्याची पाहणी केली. त्याचबरोबर मृतांच्या नातेवाईकांना साडेतीन लाख रुपये तातडीची मदत देण्याची घोषणा केली. गंभीर जखमी व्यक्तींना पन्नास हजार रुपयांची मदत जाहीर केली. तसेच या रेल्वे अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले.
 
पंतप्रधांकडून मदत जाहीर 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या रेल्वे अपघाताबाबत दु:ख व्यकत केले. तसेच या रेल्वे अपघातात जे जखमी झाले आहेत. ते लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थनाही त्यांनी केली आहे. दरम्यान पंतप्रधानांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येक दोन लाख रुपयाची मदत जाहीर केली आहे. तर गंभीर जखमींना पन्नास हजार रुपये तातडीची मदत देऊ केली आहे. पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही दु:ख व्यक्त केले आहे. गोव्यात सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातही दोन मिनिटे मौन पाळून अपघातातील मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली. 

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

पुढील लेख
Show comments