Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

प्रलयकारी पुरामुळे केरळमध्ये वर्षभर दुखवटा

Webdunia
बुधवार, 5 सप्टेंबर 2018 (09:26 IST)
केरळमध्ये आलेल्या भीषण महापूरनंतर आता राज्याच्या पुनर्वसनासाठी सर्वानी कंबर कसली आहे. या परिस्थितीत देशात मनोरंजनाचे आणि आनंदाचे उत्सव व सोहळे साजरे करणे योग्य नाही असे सांगत  राज्यात वर्षभर दुखवटा पाळला जाईल आणि आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल, केरळ युथ फेस्टिवलसह सर्व सोहळे रद्द केल्याची घोषणा मुख्यमंत्री पी विजयन यांनी  केली.
 
प्रलयकारी पुरामुळे केरळचे अपरिमित नुकसान झाले आहे.राज्याला पुन्हा पूर्वीसारखे उभे करण्यासाठी 30 हजार कोटी रुपयांची गरज आहे. देशातून लाखो हात मदतीसाठी पुढे येत आहेत यावरून राज्यावर केवढे भीषण संकट आलेय त्याची प्रचिती येते, असे सांगून मुख्यमंत्री विजयन म्हणाले, राज्य संकटात असताना आनंद सोहळे कसले साजरे करायचे? त्यापेक्षा पुरग्रस्तांचे अश्रू पुसून त्यांचे वेगाने पुनर्वसन करण्यावर आमचा भर असेल असे मुख्यमंत्री विजयन यांनी स्पष्ट केले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

कातरवेळ म्हणजे नेमकी कोणती? या दरम्यान काय करावे?

आयुष्य संकटांनी वेढलेले आहे, त्यामुळे सोमवारी करा हे सोपे उपाय

हे 5 रत्न करतील रातोरात श्रीमंत !

केळी सतत 30 दिवस खा, तुमच्या आरोग्यासाठी हे 3 आश्चर्यकारक फायदे होतील!

मुरमुरे अप्पे रेसिपी

पुढील लेख
Show comments