Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दहशतवाद्याकडून जवानाचे अपहरण

Webdunia
गुरूवार, 14 जून 2018 (17:10 IST)
जम्मू-कश्मीरमध्ये हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी समीर टायगरचा एन्काऊंटर करणाऱ्या एका जवानाचे अपहरण केले आहे.  पुलवामा जिल्ह्यात ड्युटीवरून घरी परतणाऱ्या औरंगजेब नावाच्या जवानाचे दहशतवाद्यांनी अपहरण केले आहे. हा जवान मुळचा पुंछ येथील आहे.  औरंगजेब हा पुलवामा जिल्ह्यातील शादिमार्ग येथील ४४ राष्ट्रीय रायफल्सचा जवान आहेत. रजा मंजूर झाल्याने तो खासगी वाहनाने त्याच्या पुंछ जिल्ह्याातील गावी जात होता. त्याचवेळी शोपियन सेक्टरमध्ये त्यांची गाडी थांबवून त्याचे अपहरण करण्यात आले. त्यानंतर ड्रायव्हरने याबाबत पोलिसांना कळवले. 
 
दरम्यान, शस्त्रसंधीचे निमित्त साधून रमजानच्या महिन्यात अतिरेक्यांनी दररोज हल्ले केले आहेत. २६ दिवसांत २५ हल्ले झाले आहेत. त्यामुळे शस्त्रसंधी वाढवण्याचा विचार करू नका, असा स्पष्ट इशारा लष्कराने केंद्रातील मोदी सरकारला दिला आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात

ही एक पिशवी घराच्या मुख्य दारावर लावा, पैशाशी संबंधित समस्या दूर होतील

पेल्विक हेल्थचा मुलाच्या आरोग्यावर काय परिणाम होतो,निरोगी कसे ठेवायचे ते जाणून घ्या

Relationship : परस्पर समंजसपणाने नाते जपा

अकबर-बिरबलची कहाणी : लाटा मोजणे

पुढील लेख
Show comments