Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

उत्तराखंडमध्ये भूस्खलन होऊन 15 हजार भाविक अडकले

Webdunia
शनिवार, 20 मे 2017 (13:03 IST)

उत्तराखंडमध्ये मोठ्या प्रमाणात दरड कोसळल्यामुळे जवळपास 15 हजार भाविक अडकले आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील औरंगाबादच्या 102   भाविक रूद्रप्रयागमध्ये अडकले असल्याची माहिती मदत व पुनर्वसनमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली. दरड कोसळल्यामुळे बद्रीनाथचा रस्ता बंद झाला असून तो पुन्हा सुरु करण्यासाठी दोन दिवस लागण्याची शक्यता आहे. विष्णूप्रयाग परिसरातील हाथी पर्वत भागात भूस्खलन होऊन 15 हजार भाविक अडकले आहेत. चामोली जिल्ह्यातील जोशीमठ भागापासून 9  किलोमीटर अंतरावर भूस्खलन झालं.  भूस्खलनानंतर रस्त्यावर पडलेल्या ढिगाऱ्यामुळे वाहतुकीची समस्या निर्माण झाली आहे. रस्त्यावरील मातीचे ढिगारे हटवून वाहतूक लवकरात लवकर पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.   त्यामुळे बद्रिनाथकडे जाणारी वाहतूक पूर्ववत होण्यास वेळ लागणार आहे.

सर्व पहा

नक्की वाचा

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

Mesh Rashi Varshik Rashifal 2025 in Marathi : मेष रास 2025 राशिभविष्य: नवीन वर्ष कसे असेल, निश्चित उपाय जाणून घ्या

26 नोव्हेंबरपासून बुध दोषामुळे त्रास होईल, या क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होईल !

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

पुढील लेख
Show comments