Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Ludhiyana : रेस्टारेंटच्या जेवणात मेलेला उंदीर आढळला, व्हिडीओ व्हायरल

Webdunia
मंगळवार, 4 जुलै 2023 (16:15 IST)
लुधियानामधील एका प्रसिद्ध ढाब्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात एका डिशचे फुटेज आहे ज्यावरून ढाबा मालक आणि कुटुंबात वाद झाला. फुटेजमध्ये एक मांसाहारी डिश दिसत आहे, ज्यामध्ये एका तुकड्यावर बरेच लक्ष केंद्रित केले आहे. कुटुंबाचा असा दावा आहे की त्यांनीच ही मटण डिश ऑर्डर केली होती, ज्यामध्ये मेलेला उंदीर देखील होता. हे पाहून कुटुंबीयांनी डिशचा व्हिडिओ बनवला आणि ढाब्यावर एकच गोंधळ उडाला.लुधियानाच्या विश्वकर्मा चौकाजवळील एका सुप्रसिद्ध रेस्टॉरंटमध्ये जेवायला आलेल्या कुटुंबाला त्यांच्या डिशमध्ये एक मेलेला उंदीर आढळला.
 
त्यानंतर कुटुंबीयांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला. व्हिडिओमध्ये ढाब्याचा मालक हात जोडून कुटुंबाची माफी मागताना दिसत आहे. मात्र नंतर ढाब्याच्या मालकाने आपल्या ढाब्याची बदनामी करण्याचे षडयंत्र रचल्याचे सांगितले.
हा व्हिडिओ गगनदीप सिंग नावाच्या युजरने सोशल मीडियावर शेअर केला आहे. 
 
व्हिडीओमध्ये ग्राहक असे म्हणताना ऐकू येतो की, आधी अर्धा तास जागा मिळाली नाही. त्यानंतर अर्धा तास पाणी आले नाही. नंतर दोन तासांनी त्यांची ऑर्डर आली.धाब्याच्या मालकाने ट्विट केले की आमच्या रेस्टारेंट ला बदनाम केले जात आहे. आमचे रेस्टारेंट 1968 पासून सुरु असून आजतायागत अशा प्रकारे कोणतीही तक्रार आलेली नाही.तीन महिन्यांपूर्वी या ग्राहकाचे ढाब्यावर बिलावरून भांडण झाले होते.  
व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर युजर्सची संतापजनक प्रतिक्रिया येत आहे. 
 
  Edited by - Priya Dixit 

 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

सीएम केजरीवाल यांची तुरुंगात प्रकृती बिघडली, वजन 8 किलोने घटले

भारतीय टेनिस स्टार सुमित नागल पॅरिस ऑलिम्पिक 2024 साठी पात्र ठरला

ना पाणी, ना सावली; शेकडो हज यात्रेकरूंचा उष्माघातानं मृत्यू, सौदी अरेबियात नेमकं काय घडलं?

NEET पेपर लीक प्रकरणी बिहार पोलिसांनी झारखंडच्या देवघरमधून 6 जणांना अटक केली

मनोज जरांगे पाटीलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांकडून तपासणी सुरु

पुढील लेख
Show comments