Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जेएनयू नेता उमर खालिदवर हल्ल्याचा प्रयत्न

Webdunia
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018 (08:50 IST)
जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील (जेएनयू) विद्यार्थी संघटनेचा नेता उमर खालिद याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला आहे. दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडियात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात हा प्रकार घडला. उमर खालिद या क्लबच्या परिसरातील एका चहाच्या टपरीवर काही लोकांसमवेत उभा होता. त्यावेळी एका अज्ञात व्यक्तीने त्याच्यावर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. 
 
एका प्रत्यक्षदर्शीच्या माहितीनुसार, आम्ही उमर खालिदसह चहाच्या टपरीजवळ उभे होतो. त्यावेळी पांढरा शर्ट घातलेला एक अज्ञात माणूस आमच्याजवळ आला. त्याने सुरुवातीला उमर खालिदला ढकलले आणि त्यानंतर पिस्तूल काढून त्याच्यावर गोळी झाडली. मात्र, उमर खालिद खाली पडल्यामुळे गोळीचा नेम चुकला. आम्ही त्या व्यक्तीला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो पळून जाण्यात यशस्वी ठरला. या व्यक्तीने पळून जाताना हवेत गोळीबार केला. मात्र, या प्रयत्नात त्याच्या हातातून पिस्तूल खाली पडल्याचे  सांगितले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Gajanan Maharaj Prakatdin 2025 गजानन महाराज यांच्याबद्दल संपूर्ण माहिती

श्री गजानन महाराज बावन्नी

Mandir Vastu : या वस्तू देवघरात ठेवल्याने भांडण होतात

छत्रपती शिवाजी महाराजांनी ८ वेळा लग्न का केले? त्यांच्या पत्नींशी संबंधित या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

बेरी स्वच्छ करण्यासाठी या सोप्या ट्रिक अवलंबवा

पुढील लेख
Show comments