Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

होय, मोदी सरकार ही सुटबूटवाल्यांचीच !

Webdunia
शनिवार, 20 ऑक्टोबर 2018 (07:51 IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकांच्या प्रचारादरम्यान शेतकऱ्यांना आणि कामगारांना अनेक आश्वासने दिली होती. मात्र यातील एकही आश्वासन सरकारने पाच वर्षांच्या कार्यकाळात पूर्ण केले नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष Sharad Pawar, प्रदेशाध्यक्ष Jayant Patil - जयंत पाटील , पक्षनेते Ajit Pawar,खासदार Supriya Sule, विरोधी पक्षनेते Dhananjay Munde, ज्येष्ठ नेते Chhagan Bhujbal आणि अन्य प्रमुख नेत्यांनी वारंवार शेतकऱ्यांच्या आणि कामगारांच्या प्रश्नी केंद्र आणि राज्यातील सरकारला धारेवर धरले आहे. नुकतेच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीही पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला होता. मोंदीसाठी शेतकरी नव्हे तर अनिल अंबानी, नीरव मोदीच ‘भाई’अशी टीका त्यांनी यावेळी केली होती. याच पार्श्वभूमीवर ‘लोकसत्ता’या वृत्तपत्राने फेसबुक आणि ट्विटरवर घेतलेल्या जनमत चाचणीमध्ये वाचकांनी विरोधकांची भूमिका पटत असून मोदींच्या ह्रदयात फक्त उद्योजकांनाच स्थान असल्याचे मत नोंदवले आहे.
 
अवघा महाराष्ट्र दुष्काळाने होरपळत असताना शेतकऱ्यांवर भले मोठे कर्ज झाले होते. सरकारने कर्जमाफीची घोषणा केली मात्र अद्यापही शेतकऱ्यांना कर्जमाफीची रक्कम मिळालेली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना दुप्पट हमीभाव देण्याची घोषणा केली होती मात्र शेतकऱ्यांच्या पिकांना अद्याप भाव नाही. मध्यंतरी विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकरी बोंडअळी, मावा, तुडतुड्या या रोगांमुळे त्रस्त होता. सरकारने मदतीची घोषणा केली मात्र अद्यापही शेतकरी मदतीची वाट पाहत आहेत. कामगारांचे प्रश्नीही गंभीर झाले आहेत. सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे कामगार कायदा धोक्यात आला असल्याची चिंता खा. शरद पवार यांनी एका मेळाव्यात बोलून दाखवली होती. अशी परिस्थिती असताना दुसरीकडे अनेक बडे उद्योगपती बँकांचे लाखो करोडो रुपयांचे कर्ज बुडवत परदेशी फरार होत आहेत. नीरव मोदी, विजय मल्ल्या, मेहुल चौक्सी अशी कर्जबुडव्यांची मोठी यादीच आहे, मात्र सरकार त्यांच्यावर कोणतीही कारवाई करताना दिसत नाही. त्यामुळे 'होय, मोदी सरकार हे सुटबूटवाल्यांचंच' असं जनतेने म्हणणे स्वभाविकच आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

Mesh Rashi Varshik Rashifal 2025 in Marathi : मेष रास 2025 राशिभविष्य: नवीन वर्ष कसे असेल, निश्चित उपाय जाणून घ्या

26 नोव्हेंबरपासून बुध दोषामुळे त्रास होईल, या क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होईल !

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

पुढील लेख
Show comments