rashifal-2026

अहो आश्चर्यम् , गावातील प्रत्येकाचा जन्म १ जानेवारीला

Webdunia

उत्तराखंडच्या हरिद्वारपासून सुमारे 20 किमी अंतरावर असलेल्या खाटा गावात आधार क्रमाकांशी संबंधित नवा घोळ समोर आला आहे. आधार क्रमांकानुसार गावातील प्रत्येक नागरिकाचा जन्म १ जानेवारीला झाला आहे.

आधार कार्डच्या माहितीनुसार, खाटा गावातील मोहम्मद खान यांची जन्मतारीख 1 जानेवारी आहे. त्यांचे शेजारी अलफदीन यांचीही जन्मतारीख १ जानेवारी आहे. एवढंच नाही तर अलफदीन यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांच्या जन्मतारीखही १ जानेवारी आहे. बरं हे प्रकरण इथेच थांबत नाही. या गावातील 800 कुटुंबातील प्रत्येक सदस्याचा जन्म आधार कार्डनुसार १ जानेवारी रोजी झाला आहे.  सर्व गावकऱ्यांनी आधार कार्डची नोंदणी करताना ओळखपत्र आणि मतदार ओळखपत्र दिलं होतं. तरीही एवढ्या मोठ्या प्रमाणावर निष्काळजीपणा समोर आला आहे. 

 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल 28 ते 3 जानेवारी 2025

घरात पैसा टिकत नाही? बाथरूमशी संबंधित या ४ चुका कारण असू शकतात, नक्की टाळा

जोडीदाराला भावनिकदृष्ट्या जोडण्यासाठी 6 ट्रिक्स, तुमचे नाते पूर्वीपेक्षा 10 पटीने खोल होईल

असितकृतं शिवस्तोत्रम् Asitakrutam Shivastotram

मारुती स्तोत्र : भीमरूपी महारुद्रा । वज्रहनुमान मारुती ।

पुढील लेख
Show comments