Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

करंज पाणबुडीचे जलावतरण

Webdunia
मुंबई- स्कॉर्पिन वर्गातील तिसरी पाणबुडी आयएनएस करंजचे बुधवारी जलावतरण करण्यात आले. मेक इन इंडिया अंतर्गत ही पाणबुडी तयार झाली आहे. शत्रुला लक्ष्य करणे आणि पाण्यात राहून छुप्या पद्धतीने माहिती गोळा करण्याची क्षमताही या पाणबुडीत आहे.
 
स्कॉर्पिन वर्गातील सहा पाणबुड्यांच्या निर्मितीचे काम माझगाव गोदी येथे सुरु आहे. प्रकल्प 75 अंतर्गत या पाणबुड्यांची बांधणी सुरु असून यापूर्वी कलवरी आणि खांदेरी या पाणबुडीचे जलावतरण पार पडले होते. याच वर्गातील तिसरी पाणबुडी करंजचे बुधवारी मुंबईत जलावतरण करण्यात आले. या सोहळ्याला नौदलाचे प्रमुख अॅडमिरल सुनील लांबा हे उपस्थित होते.
 
स्कॉर्पिन वर्गातील कलवरी, खंदेरीचे जलावतरण यापूर्वीच झाले आहे. प्रकल्प 75 अंतर्गत तयार होणार्‍या सहा पाणबुड्या 2010 पर्यंत नौदलात सामील करण्याचे उद्धिष्ट आहे. करंज पाणबुडी मेक इन इंडिया अंतर्गत तयार करण्यात आलेली संपूर्ण भारतीय बनावटीची पाणबुडी आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान, शत्रूंचा अचूक हेरुन त्यांना लक्ष्य करण्याची क्षमता असलेली ही पाणबुडी कमी आवाजामुळे शत्रूंना चकवा देखील देऊ शकते. हिंद महासागरात सक्रिय असलेल्या चीनला टक्कर देण्यासाठी भारतीय नौदलाच्या सामर्थ्यात भर पडणे गरजेचे आहे.

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

पुढील लेख
Show comments