Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नक्षलवाद्यांनी सुमारे तीन कोटीची वाहने जाळली

Webdunia
शनिवार, 1 डिसेंबर 2018 (16:13 IST)
गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यात नक्षलवाद्यांनी ढिगभर वाहने पेटवून दिली. यात जवळपास तीन कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीची वाहने जाळली आहे. यामध्ये दहा जेसीबी, पाच ट्रॅक्टर आणि एक कार जळून खाक झाली.
 
गेल्या सहा महिन्यांपासून एटापल्ली तालुक्यात वट्टेपल्ली ते गट्टेपल्ली दरम्यान रस्त्याचे काम सुरु आहे. मात्र या रस्त्याला नक्षलवाद्यांनी वारंवार विरोध दर्शवला. याआधी रस्त्याचे काम करणाऱ्या मजुरांना माओवाद्यांनी धमकावलं होते. 30 नोव्हेंबरच्या मध्यरात्री नक्षलवाद्यांनी मजुरांना बंदी बनवत, रस्त्याच्या कामासाठी आणलेली सर्व वाहने जाळून टाकली. या वाहनांची किंमत सुमारे तीन कोटी रुपये इतकी सांगितली जात आहे.
 
या मार्गावरुन छत्तीसगडची सीमा सुरु होते. जर हा रस्ता तयार झाला, तर नक्षलवाद्यांना समस्या निर्माण झाल्या असत्या. तसेच याच कच्च्या रस्त्यावरुन नक्षलवादी ये-जा करतात. जर पक्का रस्ता झाला तर नक्षलवाद्यांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागलं असतं. याच कारणामुळे नक्षलवाद्यांकडून वाहनं जाळण्यात आली.

संबंधित माहिती

पीएम नरेंद्र मोदींनी सांगितले, का दुखावले गेले अखिलेश यादव

घाटकोपर होर्डिंग प्रकरण : मलब्यामधून खराब अवस्थेत निघाल्या 73 गाड्या, 4 दिवसानंतर रेस्क्यू ऑपरेशन संपले

4 जूनला निवृत्त होतील PM, उद्धव ठाकरेंनी मोदींच्या बॅक टू बॅक रॅलीवर उठवले प्रश्न

नाल्यात सापडला 4 वर्षाच्या मुलाचा मृतदेह, संतप्त लोकांनी शाळा पेटवली

पुणे विमानतळाच्या धावपट्टीवर एअर इंडियाच्या विमानाला अपघात, 180 प्रवासी सुखरूप बचावले

पुढील लेख
Show comments