Festival Posters

मराठा असो किंवा पटेल, प्रत्येकाला आरक्षण मिळावे : नितीशकुमार

Webdunia
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पुन्हा एकदा आरक्षणाचा मुद्दा उचलला आहे. खासगी नोकऱ्यांमध्ये आरक्षणाची मागणी केल्यानंतर त्यांनी आता मराठा असो किंवा पटेल, प्रत्येकाला आरक्षण मिळाले पाहिजे, अशी आग्रही मागणी केली आहे. त्याचबरोबर महिला आरक्षणाचेही समर्थन करत प्रलंबित विधेयक संसदेत संमत करण्यासाठी सर्वसंमती व्हावी, असे अपीलही केले आहे.
 
दरम्यान, नितीश कुमार यांनी गुजरातमध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपचा विजय होईल, असा दावा केला आहे. ज्या पद्धतीने जनतेकडून अभिप्राय मिळत आहेत, त्यावरूनतरी भाजपचा सहज विजय होईल, असे ते म्हणाले. नितीश यांच्या वक्तव्यानंतर गुजरातमध्ये संयुक्त जनता दल (जेडीयू) निवडणूक लढवण्याची शक्यता कमी असल्याचे मानले जाते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

पुढील लेख
Show comments