Marathi Biodata Maker

तिने त्याच्या भीतीने रेल्वेतून मारली उडी

Webdunia
सोमवार, 23 ऑक्टोबर 2017 (17:08 IST)

मुंबई येथे लोकामध्ये प्रवास करत असलेल्या तरुणीला छेड काढली जाईल या भीतीने लोकामधून उडी घेतली आहे. या मध्ये ती जबर जखमी झाली आहे.या तरुणीचे नाव  पायल कांबळे असून तिने सीएसएमटी स्थानकावरुन करी रोडला जात हा प्रकार केला आहे. घडलेली घटना अशी की  सकाळी 9.29 च्या लोकलने पायल कांबळे ट्युशनसाठी निघाली ,याच वेळी  तरुण महिलांच्या राखीव  डब्यात चढला होता. मात्र तो  छेडछाड करणार या  भीतीने पायलने चालत्या ट्रेनमधून उडी घेतली. यावेळी  तिच्या पायाला  डोक्याला गंभीर दुखापत झाली. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पायल सांगते की मी निघाले होते मात्र मला  क्लासला जाण्यासाठी उशीर झाला,  मी मधील सेकंड क्लास लेडिज अपार्टमेंटमध्ये चढली होती. त्यावेळी डब्यात कोणतीही महिला प्रवासी नव्हती. तर  ट्रेन सुरु झाल्यानंतर अचानक एक तरुण डब्यात घुसला होता. त्यामुळे  मी पुरते  घाबरले होते मी  अलार्म चेन ओढली होती  पण ट्रेन थांबली नाहीच. मात्र या  तरुणाने मला शांत राहायला सांगितलं होते. मात्र  मी खूप  घाबरले होते तर मी पुन्हा  पुन्हा चेन ओढण्यास सुरुवात केली होती. तो पुन्हा पुन्हा वॉर्निंग देऊ लागला आणि जवळ येण्याचा प्रयत्न करु लागला होता मग मी घाबरून उडी मारली आहे, अशी माहिती पायलने तिने एका इंग्रजी वृत्तपत्राला दिली आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल २५ ते ३१ जानेवारी २०२६

गणपतीची आरती सुखकर्ता दुःखहर्ता Sukhkarta Dukhharta

हिवाळ्यात दररोज रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा हा चहा प्या; लिहून घ्या रेसिपी

हिवाळ्यात पनीर का खावे? आरोग्यासाठी काय फायदे आहे, जाणून घ्या

27 वर्षांनंतर शनीचे नक्षत्र परिवर्तन : 17 मे पर्यंत कोणत्या राशींना होणार मोठे लाभ आणि कोणाला होणार नुकसान?

पुढील लेख
Show comments