Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मोदींनी लखनौमध्ये या प्रकारे केला योग, जिंकले सर्वांचे मन (बघा फोटो)

Webdunia
बुधवार, 21 जून 2017 (11:23 IST)
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने उत्तर प्रदेशची राजधानी येथ आज भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात सहभागी होण्याकरता पंतप्रधान नरेंद्र मोदींचे रमाबाई उद्यानात आगमन झाले. राज्यपाल नाईक व मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह अनेक वरिष्ठ मंत्रीही उपस्थित होते. मोदींनी उपस्थित असणाऱ्या हजारो लोकांसोबत योगाभ्यास केला.
मोदी म्हणाले, की जगात ज्यांना भारताच्या संस्कृतीबद्दल फारशी माहिती नाही ते पण आज योगाचा स्वीकार करत आहेत. योग हे आत्मा, शरीर व मनाचे मिलन आहे. ज्याप्रकारे मीठ जेवणात कमी असले तरी त्याचा आपल्या स्वास्थ्यावर परिणाम होते. तसेच योग न केल्याने त्याचा आपल्या जीवनात परिणाम होतो. योग शिवाय निरोगी जीवन जगता येत नाही, असेही ते म्हणाले. लखनौत सकाळपासून पाऊस सुरू असल्यामुळे कार्यक्रमात गोंधळ उडाला. पण लोकांमध्ये योगा करण्याचा उत्साह ओसंडून वाहत होता.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

पुढील लेख
Show comments