rashifal-2026

तोगडिया यांच्या गाडीला अपघात, हत्येचा कट असल्याचा आरोप

Webdunia
बुधवार, 7 मार्च 2018 (16:30 IST)

सु रतजवळ विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांच्या गाडीला एका ट्रकने धडक दिली. या अपघातातून तोगडिया बचावले आहेत. मात्र आपल्या हत्येचा हा कट होता, असा आरोप त्यांनी केला आहे. या अपघातानंतर ट्रकचालकाला अटक करण्यात आली आहे.

“ट्रकने गाडीला मागून धडक दिली. जर माझी गाडी बुलेटप्रूफ नसती, तर मी आज जिवंत नसतो. हा माझ्या हत्येचा कट होता”, असं तोगडिया म्हणाले.

मला झेड प्लस सुरक्षा देण्यात आली आहे, मात्र पूर्ण सिक्युरिटी अद्याप का दिलेली नाही, असा सवाल तोगडियांनी उपस्थित केला आहे. मला केवळ एक व्हॅन देण्यात आली आहे. पोलिसांची एस्कॉर्ट व्हॅन आणि रुग्णवाहिका दिलेली नाही, असं तोगडियांनी सांगितलं.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल २५ ते ३१ जानेवारी २०२६

गणपतीची आरती सुखकर्ता दुःखहर्ता Sukhkarta Dukhharta

हिवाळ्यात दररोज रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा हा चहा प्या; लिहून घ्या रेसिपी

हिवाळ्यात पनीर का खावे? आरोग्यासाठी काय फायदे आहे, जाणून घ्या

27 वर्षांनंतर शनीचे नक्षत्र परिवर्तन : 17 मे पर्यंत कोणत्या राशींना होणार मोठे लाभ आणि कोणाला होणार नुकसान?

पुढील लेख
Show comments