Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पंतप्रधान मोदींची आई हिराबा पंचतत्वात विलीन, पंतप्रधान मोदींनी मुखाग्नी दिली

Webdunia
शुक्रवार, 30 डिसेंबर 2022 (09:55 IST)
पंतप्रधान मोदीं यांच्या आई हीराबेन यांचे शुक्रवारी पहाटे अहमदाबादच्या रुग्णालयात निधन झाले. हीराबेन 100 वर्षांच्या होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हीराबेन यांची प्रकृती बुधवारी खालावली, त्यानंतर त्यांना अहमदाबादमधील यूएन मेहता रुग्णालयात दाखल करण्यात आले. 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हीराबेन मोदी यांच्या पार्थिवावर गांधीनगर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबा पंचतत्त्वात विलीन झाल्या. पीएम मोदींनी त्यांच्या भावासोबत आईला मुखाग्नी दिली. 
 
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींच्या आई हिराबेन मोदी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांनी ट्विट करून लिहिले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई श्रीमती हिरा बा यांच्या निधनाची बातमी अत्यंत दु:खद आहे. या कठीण प्रसंगी, मी त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना माझ्या मनापासून संवेदना व्यक्त करतो.
आई हिराबा यांच्या निधनावर पंतप्रधान मोदींच्या कुटुंबीयांनी एक संदेश जारी केला आहे. ज्यामध्ये त्यांनी म्हटले की या कठीण काळात त्यांच्यासाठी केलेल्या प्रार्थनांसाठी आम्ही सर्वांचे आभार मानतो. सर्वांनी दिवंगत आत्म्याला आपल्या चिंतनात ठेऊन आपले पूर्वनियोजित कार्यक्रम व वचनबद्धतेने पुढे चालू ठेवावे ही नम्र विनंती. हीच हीराबांना खरी श्रद्धांजली ठरेल.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केले शोक राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांच्या निधनावर शोक व्यक्त केले.

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी वढेरा, लोकशाही आझाद पक्षाचे अध्यक्ष गुलाम नबी आझाद, त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनीही महाराष्ट्राचे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही हिराबा यांच्या निधनावर शोक व्यक्त केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हीराबेन मोदी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. नड्डा यांनी शोक व्यक्त केला. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनीही शोक व्यक्त केले.

बहुजन समाज पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांच्या निधनावर शोक व्यक्त केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांच्या निधनावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शोक व्यक्त केले .
Edited By- Priya Dixit 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

सूर्यनमस्काराने शरीर मजबूत होते, जाणून घ्या योग्य पद्धत

वर्षानुवर्षे आतड्यांमध्ये साचलेली घाण साफ होईल, सकाळी उठल्याबरोबर हे पाणी प्या

28 डिसेंबर रोजी कुंभ राशीत शुक्र आणि शनीचा संयोग 2025 मध्ये चमत्कार घडवेल, 5 राशी धनवान होतील

साप्ताहिक राशीफल 23 डिसेंबर ते 29 डिसेंबर 2024

Kanya Lal Kitab Rashifal 2025: लाल किताबनुसार कन्या राशी भविष्य 2025 आणि उपाय

पुढील लेख
Show comments