rashifal-2026

संजय दत्तच्या बहिणीवरून कॉंग्रेस मध्ये वाद

Webdunia
सोमवार, 1 ऑक्टोबर 2018 (08:58 IST)
होय संजय दत्तच्या बहिणीवरून काँग्रेस पक्षात वाद निर्माण झाला आहे. माजी खासदार प्रिया दत्त मुळे कॉंग्रेस मध्ये दोन गट पडले आहे. मुंबई येथे कॉंग्रेस नेते संजय निरूपम यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून दूर केले आणि वाद निर्माण झाला होता. संजय निरुपम यांनी आयोजित केलेल्या उत्तर-मध्य मतदारसंघाच्या बैठकीत हा प्रकार समोर आला आहे. येत्या लोकसभा निवडणुकीसाठी मतदारसंघातून प्रिया दत्त यांना उमेदवारी दिली जाईल, असे समोर येताच, हा निर्णय अनेक कार्यकर्त्यांना न रुचल्याने त्यांनी बैठकीच्या ठिकाणाबाहेर गोंधळ घातला आहे. २०१४ च्या निवडणुकीत पराभव झाल्यापासून प्रिया दत्त या मतदारसंघाकडे आल्या सुद्धा नाहीत. प्रिया यांनी पराभवानंतर मतदारसंघात लक्ष घालून तेथील जनतेची कामे केली पाहिजे होती. प्रिया दत्त यांनी गेल्या साडेचार वर्षात मतदारसंघात मोर्चेबांधणी तर सोडाच पण साधा कार्यकर्त्यांशीही संपर्क ठेवलला नाही. त्यामुळे आता या मतदारसंघातील उमेदवारीवरून निरुपम विरोधी गट काय भूमिका घेणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे आता कोन्ग्रेस कोणाला उमेदवारी देणार आणि हा बंड कसा शमविणार हा प्रश्न आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Mahabharat : द्रौपदीच्या सुंदर शरीराचे रहस्य काय होते?

Indian Navy Recruitment 2026: बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी भारतीय नौदलात भरती

या टिप्स फॉलो केल्याने तुमची त्वचा बराच काळ तरुण राहील

हिवाळ्यात हीटर चालवताना कधीही या चुका करू नका

व्यायामानंतरच्या या 3 चुका तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात; तज्ञांकडून योग्य उपाय जाणून घ्या

पुढील लेख
Show comments