rashifal-2026

भैय्या संजय निरुपमच्या कार्यालयावर सर्जिकल स्ट्राईक..

Webdunia
शुक्रवार, 1 डिसेंबर 2017 (15:39 IST)

मनसे परप्रांतीय यावर पुन्हा आक्रमक भूमिका घेतली असून, मनसेच्या सैनिकांनी आज   मुंबई काँग्रेस कार्यालयावर हल्ला केला आहे. या  हल्ल्याची जबाबदारी मनसेने स्वीकारली आहे. काँग्रेसचं कार्यालय मनसेनच्या कार्यकर्त्यांनी फोडले आहे.  फोडलं,भैय्या संजय निरुपमच्या कार्यालयावर सर्जिकल स्ट्राईक.. अशा आशयाचं ट्विट मनसे नेते  संदीप देशपांडे यांनी केलं आहे.

आज सकाळी मुंबई काँग्रेसच्या कार्यालयाची अज्ञातांकडून तोडफोड करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी तीन मनसे कार्यकर्ते ताब्यात घेतले आहेत.त्यामुळे मनसे आणि निरुपम वाद वाढला आहे.छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळच्या काँग्रेस कार्यालयाची आज सकाळी तोड फोड करण्यात आली आहे. कॉंग्रेस चे  आझाद मैदानाजवळ कार्यालय आहे. या कार्यालयात घुसून मनसेने काँग्रेस कार्यालयाच्या काचा आणि इतर साहित्य फोडले आहे. आधी हे कोणी केले स्पष्ट नव्हत मात्र संदीप देशपांडे यांनी जबाबदारी स्विकारली आहे.

संजय निरुपम हे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. फेरीवाल्यांवरुन सध्य मनसे आणि संजय निरुपम यांच्यात वाद सुरु आहे. या  हल्ल्याचा आम्ही तीव्र निषेध करतो. विचारांची लढाई विचारांनीच लढायला हवी, तोडफोड किंवा मारहाण करुन नाही, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली आहे.

 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा भैय्या संजय निरुपमच्या कार्यालयावर सर्जिकल स्ट्राईक..
इट का जवाब पथ्थर से मिलेगा..

 
  •  

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पत्नी अजूनही तिच्या माजी प्रियकरावर प्रेम करत असेल तर काय करावे?

दररोज कमी पाणी पिण्याची सवय मुतखड्याचा धोका वाढवू शकते

वॅक्सिंग करताना या टिप्स अवलंबवा

मकर संक्रांतीला मासिक पाळी आल्यावर काय करावे

२०२६ मध्ये या ४ राशींचे भाग्य पूर्णपणे बदलेल, तुम्ही तयार आहात का?

पुढील लेख
Show comments