Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शरद यादव आणि अली अनवर यांची राज्यसभेतून हकालपट्टी

Webdunia
मंगळवार, 5 डिसेंबर 2017 (09:29 IST)

जेडीयूचे वरिष्ठ नेते शरद यादव आणि अली अनवर यांचं राज्यसभेचं सदस्यत्व रद्द करण्यात आलं आहे. दोघांवरही जेडीयूने पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत राज्यसभा सचिवालयाकडे त्यांचं सदस्यत्व रद्द करण्यासंदर्भात तक्रार केली होती. या तक्रारीवरुन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंनी दोन्ही नेत्यांचं सदस्यत्व रद्द केलं.  शरद यादव यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ बाकी होता. तर अली अनवर यांचा सहा महिन्यांचा कार्यकाळ बाकी होता. 

गेल्या काही दिवसांपासून नितीश कुमार आणि शरद यादव यांच्यात अंतर्गत कलह शिगेला पोहचला होता. नितीश कुमारांनी बिहारमधील लालू प्रसाद यादव यांच्या आरजेडीसोबतचं महागठबंधनचं सरकार बरखास्त करत, भाजपशी हातमिळवणी करुन पुन: सत्ता स्थापन केली. याला शरद यादव यांनी तीव्र विरोध केला होता.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

पुढील लेख
Show comments