Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

धक्कादायक !मृत वडिलांना जिवंत करण्यासाठी 2 महिन्याच्या बाळाचे अपहरण! आरोपीला अटक

Webdunia
शनिवार, 12 नोव्हेंबर 2022 (16:08 IST)
आपण जरी आधुनिकतेकडे वाटचाल करत असलो तरीही अजून देखील समाजात अंधश्रदेला बळी पडणारे आहेत. या अंधश्रद्धेमुळे निष्पाप लोकांचा बळी दिला जातो काही लोक धनप्राप्ती साठी अंधश्रद्धेला बळी पडतात तर काही अपत्य प्राप्तीसाठी .फसवे आणि भोंदू बाबा भोळे भाबडे लोकांना फसवून बळी देतात. अशीच धक्कादायक घटना देशाची राजधानी दिल्ली येथे घडली आहे. आपल्या मृत पिताला जिवंत करण्यासाठी एका तरुणीने 2 महिन्यांच्या चिमुकल्याचा अपहरण केल्याची घडली आहे. त्या चिमुकल्याचा बळी देऊन आपल्या मृत पित्याला जिवंत करण्याचा प्रयत्नात ही तरुणी होती.  
 
राजधानी दिल्लीत, एका 25 वर्षीय महिलेने तिच्या मृत वडिलांना जिवंत करण्यासाठी बाळाची बळी देण्यासाठी' दोन महिन्यांच्या बाळाचे अपहरण केले.महिलेचा बेत यशस्वी होण्यापूर्वीच पोलिसांनी तिला अटक केली.गुरुवारी संध्याकाळी दिल्लीतील गढी भागातून मुलाचे अपहरण करण्यात आले.या प्रकरणाच्या तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेजने बाल अपहरण प्रकरणाचा तपास लावला. आरोपी श्वेताला अटक केली.
 
 
दिल्लीतील कोटला मुबारकपूर येथील रहिवासी असलेली आरोपी श्वेता हिने नववीपर्यंत शिक्षण घेतले आहे.ती आईसोबत राहत होती.तिच्यावर यापूर्वी डकैती आणि चोरीच्या 02 गुन्ह्यात सहभाग होता. आरोपी श्वेताच्या वडिलांचा ऑक्टोबर मध्ये मृत्यू झाला. पित्याच्या अंत्यसंस्काराच्या वेळी तिला कोणीतरी आपल्या मयत पिताला पुनर्जीवन देण्यासाठी एका लहानग्या बाळाची बळी देण्याचे सुचवले. आरोपीने बाळाचा शोध घेण्यास सुरुवात केली. तिने दिल्लीच्या सफरदरजंग रुग्णालयातून दोन महिन्यांच्या चिमुकल्या बाळाची चोरी केली. 

गुरुवारी 10 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 4:00 वाजता अमर कॉलनी पोलिस स्टेशनला माहिती मिळाली की दिल्लीच्या गढी परिसरातून सुमारे दोन महिन्यांच्या चिमुकयाचे  महिलेसह अपहरण करण्यात आले आहे. आरोपीने स्वतःला बाळाचा सांभाळ करणाऱ्या स्वयंसेवीसंस्थेचे सदस्य सांगून चिमुकल्या बाळाला बाळाच्या आईकडून नेले. बाळाच्या आईने आपल्या भाचीला श्वेता सोबत पाठविले,त्यानंतर अपहरणकर्ते नीम चौक, गढी येथे आले आणि पीडितेची भाची रितू हिच्यासह नवजात बालकाला त्यांच्या स्विफ्ट कारमध्ये घेऊन गेले.वाटेत श्वेताने रितूला पेय दिले, जे प्यायल्यानंतर ती बेशुद्ध झाली.त्यानंतर अपहरणकर्त्याने रितूला उत्तर प्रदेशातील गाझियाबादच्या वाटेवर फेकून दिले, जिथे शुद्धीवर आल्यानंतर तिने मुलाचे अपहरण झाल्याची माहिती तिच्या कुटुंबीयांना दिली. नंतर संधी साधून आरोपी श्वेता बाळाला घेऊन पसार झाली.  
 
यानंतर ठाणे अमर कॉलनीत एफआयआर नोंदवून प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला. आणि पोलिसांनी एक विशेष पथक तयार करून अपहरणकर्त्याच्या वाहनाचा नोंदणी क्रमांक शोधून त्याचा पत्ता व तपशील समोर आला.या ठिकाणी पोलिसांनी छापा टाकला, मात्र आरोपी फरार झाला होता.दुपारी चार वाजण्याच्या सुमारास अपहरणकर्ता आर्य समाज मंदिर, कोटला मुबारकपूर, दिल्लीजवळ येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली.पथकाने आरोपी अपहरणकर्त्याला पकडण्यासाठी सतत प्रयत्न केले आणि चिमुकल्याला सुखरूप आईच्या कुशीत दिले.  
 
Edited By -Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Margashirsha Purnima 2024: मार्गशीर्ष पौर्णिमेला लक्ष्मी देवीची कृपा मिळविण्यासाठी कोणते उपाय करावेत?

Annapurna Jayanti 2024: अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी स्वयंपाकघरात किती दिवे लावावेत?

वृश्चिक राशीत बुधाचा उदय या राशींसाठी खूप शुभ राहील

बाळासाठी भगवान दत्तात्रेयाच्या नावावरुन सुंदर नावे

दत्त जयंती विशेष रेसिपी : सुंठवडा

पुढील लेख
Show comments