Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सोमनाथ मंदिर हे आत्मविश्वासाचे प्रतीक आहे, दहशतवादामुळे विश्वास ठेचला जाऊ शकत नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी

Webdunia
शुक्रवार, 20 ऑगस्ट 2021 (13:25 IST)
पंत प्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी ऐतिहासिक सोमनाथ मंदिराशी संबंधित अनेक प्रकल्पांचे उद्घाटन केले. या दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की आपल्याला देशात धार्मिक पर्यटन बळकट करण्याची गरज आहे.यामुळे तरुणांना रोजगार मिळेल. एवढेच नाही तर त्यांना त्यांच्या इतिहासाची माहितीही मिळेल. सोमनाथच्या इतिहासाचा संदर्भ देत ते म्हणाले की, दहशतवादामुळे या वरील विश्वास नष्ट होऊ शकत नाही. आपण आपल्या इतिहासापासून शिकले पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमनाथशी संबंधित प्रकल्पांचे उद्घाटन एका व्हर्च्यूवल कार्यक्रमात केले. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, गृहमंत्री अमित शहा, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि इतर अनेक सेलिब्रिटी देखील उपस्थित होते. लालकृष्ण अडवाणी हे सोमनाथ मंदिर ट्रस्टशीही संबंधित आहेत. 
 
सोमनाथ हे फक्त मंदिर नाही, ते आत्मविश्वासाचे प्रतीक आहे.पंतप्रधान म्हणाले की, जगभरातून लोक सोमनाथ मंदिराला भेट देण्यासाठी येत आहेत.पण आता आपण  इथे समुद्र दर्शनासह इतर अनेक गोष्टी पाहू शकाल.आता लोक येथे पार्वती मंदिर आणि जूना सोमनाथ मंदिराला भेट देऊ शकतील.यामुळे लोकांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील.पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज सोमनाथ प्रदर्शन दालनाचेही उद्घाटन होत आहे. यामुळे तरुणांना इतिहासाशी जोडण्याची आणि त्याच्या प्राचीन रूपातील श्रद्धा पाहण्याची संधी मिळेल. सोमनाथ ही शतकानुशतके सदाशिवची भूमी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, सोमनाथचे हे मंदिर आपल्या आत्मविश्वासाचे प्रेरणास्थान आहे. ते म्हणाले की जगातील कोणतीही व्यक्ती जेव्हा ती पाहते, तेव्हा त्याला फक्त मंदिर दिसत नाही, तर त्याला असे अस्तित्व दिसते, जे मानवतेची मूल्ये सांगतात.
 
सोमनाथ ट्रस्टच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारणारे पंतप्रधान मोदी म्हणाले की, आजही हे मंदिर संपूर्ण जगाला सांगत आहे की सत्याचा असत्याने पराभव होऊ शकत नाही. विश्वासाला दहशतीने चिरडता येत नाही. शेकडो वर्षांच्या इतिहासात हे मंदिर किती वेळा मोडले गेले, मूर्ती तोडल्या गेल्या. पण जितक्या वेळा ते तोडले गेले, तितक्या वेळा ते उभे राहिले. आज सोमनाथ मंदिर हा केवळ भारतासाठीच नाही तर संपूर्ण जगासाठी एक संदेश आहे की तोडणाऱ्या शक्ती काही काळ वर्चस्व गाजवू शकतात.पण त्यांचे अस्तित्व कायम नाही.ते मानवतेला जास्त काळ दडपू शकत नाहीत. हे तेवढेच खरे होते जेव्हा काही दहशतवादी मंदिर पाडत  होते. हे आज देखील तेवढेच खरे आहे, सध्या जग दहशतवादाला घाबरत आहे. आपल्या सर्वांना माहित आहे की सोमनाथ मंदिराची ही भव्यता काही वर्षांच्या प्रवासाचे नसून शतकांच्या संघर्षाचे फळ आहे. 
 
या प्रसंगी, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले की, आज राम मंदिराच्या स्वरूपात नवीन भारताचा गौरव उभारत आहे.आपण इतिहासातून शिकले पाहिजे आणि वर्तमान सुधारण्यासाठी आणि भविष्य घडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जेव्हा मी इंडिया जोडो बद्दल बोलतो, तेव्हा भविष्याचा भारत घडवण्यासाठी भूतकाळाशी जोडण्याचा संकल्प आहे. या आत्मविश्वासामुळेच आपण भूतकाळाच्या अवशेषांवर भविष्य घडवले आहे.
 
पंतप्रधान मोदी  यांनी पार्वती देवी मंदिराची पायाभरणी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, या प्रसंगी मी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या चरणी नतमस्तक होतो, ज्यांनी देशाचे प्राचीन वैभव परत आणण्यासाठी काम केले. त्यांनी सोमनाथ मंदिराला स्वतंत्र भारताच्या स्वतंत्र चेतनेचे प्रतीक बनवले होते. पंतप्रधान मोदी म्हणाले की,आज देश सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनात आधुनिकता आणि पुरातनतेच्या संगमाचे अनुसरण करत आहे.पीएम मोदी म्हणाले की धार्मिक पर्यटनाच्या शक्यतांचा शोध घेणे आवश्यक आहे.स्थानिक अर्थव्यवस्थेचा धार्मिक स्थळांशी असलेले संबंध दृढ करा.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Gajanan Maharaj Prakatdin 2025 गजानन महाराज यांच्याबद्दल संपूर्ण माहिती

श्री गजानन महाराज बावन्नी

Mandir Vastu : या वस्तू देवघरात ठेवल्याने भांडण होतात

छत्रपती शिवाजी महाराजांनी ८ वेळा लग्न का केले? त्यांच्या पत्नींशी संबंधित या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

बेरी स्वच्छ करण्यासाठी या सोप्या ट्रिक अवलंबवा

पुढील लेख
Show comments