सासूवर जडले जावायाचे प्रेम, सासऱ्याने लावून दिले लग्न. बिहारच्या बांका मधून एक बातमी समोर आली आहे, जिला वाचून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल, तर दुसरीकडे हसू देखल येईल. एका जावयाचे प्रेमप्रकरण आपल्या सासूसोबतच सुरु होते. याची भनक सासर्याला लागली होती. यानंतर सासऱ्यांनी दोघांना पकडले, त्यानंतर पूर्ण गावासमोर दोघांचे लग्न लावून दिले. जिथे 55 वर्षीय दिलेश्वर दर्वे यांनी आपली 45 वर्षीय पत्नी गीता देवीचे लग्न जावयासोबत लावून दिले.
बांकाचे छत्रपाल पंचायतचे हीर मोती गावामध्ये घडलेली ही घटना पूर्ण जिल्ह्याचा चर्चेचा विषय ठरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पत्नीच्या मृत्यू नंतर सिकंदर आपल्या सासरी राहू लागला. या दरम्यान परिणामी सासू-जावई एकमेकांजवळ आलेत. सासऱ्याला शंका आली त्याने तपास केला, ज्यामुळे दोघांचे प्रेमप्रकरण समोर आले. दोघांना रंगेहात पकडले. दिलेश्वर ने याची माहिती पंचायत मध्ये दिली. सिकंदर यादव ने पंचायत आणि गावासमोर सासूवर प्रेम असल्याचे कबूल केले. यानंतर दिलेश्वर आणि पंचायतच्या परवानगीने सिकंदर आणि गीता देवी यांचे लग्न लावण्यात आले. दिलेश्वर ने आपली पत्नी आणि जावई यांच्या मध्ये कोर्ट मॅरेज करून दिले. गावकऱ्यांसमोर जावई आपल्या सासूला लग्न करून आपल्या घरी घेऊन गेला.