rashifal-2026

'माझ्यापेक्षा प्रणव मुखर्जी पंतप्रधान पदासाठी अधिक योग्य'

Webdunia
शनिवार, 14 ऑक्टोबर 2017 (12:40 IST)
‘2004 साली सोनिया गांधींनी माझी पंतप्रधानपदी निवड केली. पण माझ्यापेक्षा प्रणव मुखर्जी हे त्या पदासाठी अधिक योग्य होते.’ असं वक्तव्य मनमोहन सिंह यांनी केल आहे.  माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या ‘द कोलिशन इयर्स 1996-2012’ या पुस्तक प्रकाशनाच्या वेळी ते बोलत होते. या सोहळ्याला काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी हे देखील उपस्थित होते.

 या कार्यक्रमात बोलताना मनमोहन सिंह म्हणाले की, ‘मी राजकारणात अपघातानं आलो होतो. पण प्रणव मुखर्जी हे अगदी ठरवून राजकारणात आले होते. 2004 साली जेव्हा सोनिया गांधींनी पंतप्रधान म्हणून माझी निवड केली त्यावेळी मला माहित होतं की, प्रणव मुखर्जी हे त्या पदासाठी अधिक योग्य आहेत. पण त्यावेळी माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता. त्यावेळी जर प्रणब मुखर्जी यांनाही असंच वाटत असेल तर त्यात काहीही गैर नाही ' असे त्यांनी सांगितले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Morning Mantras सकाळी उठल्यावर या 4 मंत्रांचा उच्चार करा, सर्व अडचणी दूर होतील

उत्तम करिअर घडवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

तुळशीचे झाड काळे पडत आहे का? हे कारण असू शकते का? प्रतिबंधात्मक टिप्स जाणून घ्या

साप्ताहिक राशिफल 04 ते 10 जानेवारी 2026

मकरसंक्रांती रेसिपी : सोपी तीळ-गुळाची बर्फी

पुढील लेख
Show comments