केंद्रात सत्ता असलेल्या भाजपच्या विरोधकांच्या सत्तेतील राज्यांमध्ये अनेकदा तपास अधिकारी आणि राज्य सरकारचा संघर्ष पाहायला मिळतो. पण आयपीएस अधिकाऱ्यांनी न घाबरता बिनधास्त गुन्हेगारांवर कारवाई करावी असा सल्ला वजा आदेश केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी दिला आहे.
शहा यांनी भारतीय पोलिस सेवेच्या 2020 च्या 122 अधिकाऱ्यांच्या बॅचबरोबर संवाद साधला. केंद्रीय तपास संस्था किंवा राज्यांत नियुक्तीवर असलेल्या या अधिकाऱ्यांना शहा यांनी हा संदेश दिला.
गुन्हेगारांवर बेधडक कारवाई करताना राज्यांच्या अधिकारांचा मात्र विचार करा आणि संविधानाच्या चौकटीत राहून काम करण्याचा सल्लाही शहा यांनी या अधिकाऱ्यांना दिला आहे.
माझं काय होईल या भीतीखाली न राहता, कर्तव्याचं पालन करावं लागेल असं अमित शहा यांनी म्हटलं आहे.