राजस्थानमधील चित्तौडगड जिल्ह्यातील निंबाहेरा तहसीलच्या उनखलिया गावात घर बांधण्यापूर्वी कडुलिंबाचे झाड लावण्याची परंपरा आहे. तसेच ही परंपरा 70 वर्षांपासून सुरू असून यानिमित्ताने गावाभोवती 1500 हून अधिक कडुलिंबाची झाडे लावण्यात आली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार पूर्वी या गावाजवळ गंभीरी नदी होती, गावातल्या गल्ल्या अरुंद होत्या, उन्हाळ्यात जमीन गरम असायची आणि उष्ण वाऱ्याबरोबर धूळ उडत राहायची. पण आजकाल या गावातील सौंदर्य आणि हिरवळ आजूबाजूच्या गावांनाही आकर्षित करत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार उंखलिया गावात 400 कुटुंबे राहतात आणि घराच्या आत आणि बाहेर एकूण 1500 कडुलिंबाची झाडे लावलेली आहेत. या गावात कडुलिंबाची झाडे लावण्याची परंपरा असण्यामागील कारण म्हणजे कडुलिंबात औषधी गुणधर्म आहेत. सरपंच आणि निंबाहेराचे प्रमुख सांगतात की, स्वातंत्र्याच्या वेळीच ज्येष्ठांनी जीवनरक्षक वृक्षांवर प्रेमाची ही परंपरा सुरू केली होती आणि भविष्यातही ती सुरू ठेवण्याचा संकल्प केला आहे. आता गावकरी कडुलिंबाच्या झाडाखाली योगासने करतात, चर्चा करतात आणि दिवसभर विश्रांती घेतात.
काही वैज्ञानिकांच्या मते, कडुलिंब बॅक्टेरिया पासून सुरक्षित ठेवते. त्यापासून अनेक औषधी उपायही बनवले जातात. याशिवाय कडुनिंबावर विषारी जीव राहत नाहीत, त्यामुळे ते अधिक फायदेशीर ठरते.