Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आईचा फोटो बघून चोराने परत केले पाकीट

Webdunia
चोरांनादेखील भावना असतात हे या घटनेवरून सिद्ध होते. ही घटना आहे मध्यप्रदेशातील होशंगाबाद येथील. एका चोराने एका व्यक्तीचे पाकीट मारले आणि ते उघडून बघितले तर त्यात 1200 रुपये, पॅन कार्ड, आधार कार्ड, ड्रायविंग लायसन्ससारख्या महत्त्वाच्या गोष्टी व अजून एक विशेष गोष्ट होती ती म्हणजे आईचा फोटो.
 
पाकिटात असलेला आईचा फोटो पाहून चोर इतका भावुक झाला की त्याने ते पाकीट मालकाला परत केले. होशंगाबाद येथील अमर चौक येथे राहणार्‍या अस्लम याचे ते पाकीट होते. चोराने कुरिअर करून ते पाकीट त्याला परत केले. पाकीट परत मिळाल्यानंतर अस्लम याने सांगितले की 25 जुलैला तो पत्नीच्या उपचारासाठी फरीदाबाद येथे गेला होता. त्याचवेळेस तो दिल्लीच्या बाजारातदेखील गेला. बाजारात फिरताना त्याचे पाकीट कोणीतरी मारले. त्यानंतर त्याने दिल्लीच्या पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली.
 
अस्लमने सांगितले की पाकीट चोरी झाल्यानंतर दोन महिन्यांनी माझ्या घरी एक कुरिअर आले. त्यात माझे हरवलेले पाकीट होते आणि त्यात एक चिठ्ठीदेखील होती. त्यावर एक नंबर लिहिला होता. त्या नंबरवर त्याने फोन केल्यावर पलीकडून सांगण्यात आले की 1200 रुपये सोडून सगळ्या वस्तू परत करत आहे.
 
त्याव्यतिरि‍क्त अस्लमने सांगितले की पाकीट परत करणार्‍या चोराने सांगितले की, मी पण माझ्या आईवर खूप प्रेम करतो. पाकिटातील आईचा फोटो पाहून तूदेखील आईचा लाडका आहेस, असे दिसते. म्हणून पाकीट कुरिअरने परत पाठवत आहे. या सर्व घटनेनंतर अस्लमने दिल्ली पोलिस स्टेशनमध्ये जाऊन पाकीट मिळाल्याचे कळवले.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

पुढील लेख
Show comments