Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पुन्हा रेल्वे उलटवण्याचा प्रयत्न, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली

Webdunia
बुधवार, 9 ऑक्टोबर 2024 (15:36 IST)
रेल्वेविरोधात षडयंत्र सुरूच आहे. आता ग्वाल्हेर आणि रायबरेलीत ट्रेन उलटवण्याचा कट रचला गेला. पण सुदैवाने मोठी दुर्घटना घडली नाही. या दोन्ही प्रकरणांचा तपास सुरू करण्यात आला आहे. याआधी देखील कानपूरमध्ये अनेकदा ट्रेन उलटवण्याचा कट रचला गेला होता. रायबरेलीच्या जगतपूर आणि दरियापूर रेल्वे स्थानकादरम्यान हा कट रचण्यात आला होता.
 
मिळालेल्या माहितीनुसार मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर आणि उत्तर प्रदेशातील रायबरेली येथे रेल्वे उलटवण्याचा कट पुन्हा उघडकीस आला आहे. ग्वाल्हेरमध्ये सोमवारी रात्री उशिरा बिर्ला नगर स्थानकाच्या बाहेरील बाजूच्या तिसऱ्या लाईनच्या रुळांवर तारांनी बांधलेल्या जाड लोखंडी रॉड्स ठेवण्यात आल्या होत्या. तसेच त्याच रुळावरून येणाऱ्या मालगाडीच्या लोको पायलटला रात्री दीड वाजण्याच्या सुमारास रॉड दिसल्यावर त्याने इमर्जन्सी ब्रेक लावून ट्रेन थांबवली आणि अपघात टळला.
 
रायबरेलीतील जगतपूर-दरियापूर स्टेशनदरम्यान बेनिकामा गावाजवळ रेल्वे रुळावर सिमेंटचे स्लीपर गाडण्यात आले. पॅसेंजर ट्रेनच्या आधी मालगाडी आली. लोको पायलटने हे पाहिले आणि ब्रेक लावून ट्रेन थांबवली. पण संरक्षणासाठी लावलेला लोखंडी पत्रा स्लीपरला धडकला. ही माहिती मिळाल्यानंतर मंगळवारी दिवसभर झाशी विभाग ते प्रयागराज मुख्यालयापर्यंत तपासणी सुरू होती. 

Edited By- Dhanashri Naik 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

रावणाच्या मृत्यूचे हे कारण तुम्हाला आश्चर्यचकित करेल

विजयादशमीच्या दिवशी आपट्याची पाने का वाटतात?

प्रत्येक समस्यांचे निराकरण : नवरात्रीत विड्याच्या पानांनी करा हे 5 चमत्कारी उपाय

Fatty Liver Natural Treatment या 5 आयुर्वेदिक औषधी फॅटी लिव्हरसाठी रामबाण उपाय

लव्ह मॅरेज की अरेंज्ड मॅरेज काय योग्य आहे? जाणून घ्या

पुढील लेख
Show comments