Dharma Sangrah

पंचतारांकीत हॉटेलमधून टब बाथ हद्दपार होणार

Webdunia
शनिवार, 24 फेब्रुवारी 2018 (10:40 IST)

देशातील पंचतारांकीत हॉटेलच्या आलिशान बाथरूममधून बाथ टबला सुट्टी देण्याचा विचार  सुरु आहे.  पंचरातांकीत हॉटेल क्षेत्रातील ओबेरॉय, ताज, आयटीसी यासारख्या पंचरातांकीत हॉटेल्सची चेन असलेले बड्या कंपन्या आपल्या बाथरुममध्ये बदल करण्याचा विचार करत आहेत. या कंपन्यांच्या मते त्यांच्याकडे येणारा ग्राहक कामात व्यस्त असल्याने तो बाथ टब मध्ये स्नान करण्याचे टाळतो. तो सहसा शॉवर घेतो. त्यामुळे बाथरुममधील हे भेलेमोठे बाथ टब काढून अत्याधुनिक शॉवर क्युबिक्स बसवण्याचा विचार करत आहेत. त्यातच पंचतारांकीत हॉटेलचे काही निकष बदलेले आहेत. त्यामुळे पंचतारांकीत हॉटेलमधून आता टब बाथ हद्दपार होणार आहेत. 

टब बाथची जागा आता शॉवर क्युबिक्स घेणार आहे.  सध्यातरी हे बदल बेंगळुरु आणि मुंबई सारख्या मोठ्या शहरातील पंचतारांकीत हॉटेलमधे हे बदल केले आहेत. पण, राजस्थान आणि केरळमधील हॉटेलमध्ये टब बाथ काढण्याचा इतक्यात विचार  नसल्याचे या कंपन्यांनी सांगितले. त्याचबरोबर सरसकट टब बाथ काढण्याऐवजी जेथे टब बाथची गरज नाही तेथुनच ते काढण्यात येणार आहेत.  

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

पुढील लेख
Show comments