Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पत्नीचा गळा कापून 6 तुकडे केले, पिशवीत भरुन कालव्यात फेकले

Webdunia
बुधवार, 17 जानेवारी 2024 (17:09 IST)
कोलकातामध्ये जमिनीच्या वादातून पतीने पत्नीचे सहा तुकडे करून निर्घृण हत्या केली. एवढेच नाही तर पोलिसांपासून वाचण्यासाठी आरोपींनी मृतदेहाचे तुकडे कालव्यात फेकून दिले आणि नंतर स्वतः पोलिस ठाणे गाठले.
 
55 वर्षीय बांधकाम साहित्य पुरवठादार नुरुद्दीन मंडल याने जमिनीसाठी पत्नी सायरा बानो (50) हिची निर्घृण हत्या केली. हत्येनंतर पतीने पत्नीच्या मृतदेहाचे सहा तुकडे केले आणि नंतर ते पिशवीत भरून कालव्यात फेकले. त्यांच्या विवाहित मुलीने ही घटना उघड केली. मुलीने आईच्या मोबाईलवर रक्ताचे डाग पाहिल्यानंतर ही हत्या उघडकीस आली.
 
पोलिसांनी आरोपीची चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आणि कालव्यातून मृतदेहाचे तुकडेही जप्त केले. 
 
आरोपीने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली असून त्याने आधी पत्नीचा गळा कापला आणि नंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे केले. या प्रकरणात मालमत्तेचा वाद झाल्याचा आरोपही पोलिस करत आहेत. मुलगी मणीबीबीने सांगितले की मध्यग्राम येथे तिच्या आईच्या नावावर तीन कट्टा जमीन आणि घर आहे. जी माझ्या वडिलांना बळकावायची होती पण आईने जमीन देण्यास नकार दिला. यामुळे आईची हत्या करण्यात आली.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

10 ऑक्टोबर रोजी बुध गोचर, 3 राशींवर दुखाचा डोंगर कोसळेल!

घरात मांजर ठेवणे शुभ की अशुभ?

देवीचे कुंकुमार्चन कसे करावे?

महिषासुरमर्दिनी स्तोत्रम् पाठ करा, इच्छित फल मिळवा

संपूर्ण देवी कवचे

पुढील लेख
Show comments