Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Women Fight Viral : धावत्या बसमध्ये महिलांची हाणामारी, व्हिडीओ व्हायरल

Webdunia
शनिवार, 28 ऑक्टोबर 2023 (11:14 IST)
Women Fight Viral : अनेकदा बस मध्ये किंवा ट्रेन मध्ये सीट वर बसण्यावरून भांडण होतात. तसेच दिल्ली मेट्रोचे दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होतात. मेट्रोमध्ये सीटवरून महिलांचे भांडण होण्याचे व्हिडीओ अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. आता यावेळी डीटीसी बसचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये काही महिला सीटवरून आपापसात भांडताना दिसत असल्याचा दावा केला जात आहे.
 
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ दिल्ली मेट्रोचा नसून डीटीसी बसचा आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की दोन महिला एकमेकींचे केस ओढून भांडण करताना दिसत आहे. काही लोक त्यांना रोखण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांना भांडताना पाहून काही मुलांनी रडायला सुरु केले. हा व्हिडीओ दिल्लीतील डीटीसी बसचा आहे. काही महिलांमध्ये बाचाबाची झाली आणि त्यानंतर त्यांच्यात हाणामारी झाली. 
 
हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पूर्वी ट्विटर) वर Delhi Buses नावाच्या पेजने शेअर केला आहे. 
 
व्हिडिओसोबतच्या कॅप्शनमध्ये ही लढत सीटवरून होत असल्याचं म्हटलं आहे. 76 हजारांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. लोक या व्हिडिओवर मजेशीर प्रतिक्रिया देत आहे. 
 


Edited by - Priya Dixit   
 

संबंधित माहिती

प्रियंका गांधी वायनाड मतदारसंघातून लढणार निवडणूक, राहुल गांधी रायबरेली राखणार

राज्य सरकार ने उपोषणाला बसलेल्या ओबीसी नेत्यांनी मांडलेल्या प्रश्नांकडे लक्ष द्यावे -पंकजा मुंडे

राहुल गांधी रायबरेली तर प्रियंका गांधी वाड्रा वायनाडमधून निवडणूक लढवतील खरगे यांची घोषणा

वक्फ बोर्डाने हिंदू-आदिवासींच्या जमिनी बळकावल्याचा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा मोठा आरोप

प्राण्यांमध्ये जाणिवा असतात का, त्यांना ही भाव-भावना असतात का?

पुढील लेख
Show comments