गाई कोकीळ भूपाळी सखे तुझ्या स्वागताला इंद्रधनूचे तोरण शोभे तुझ्या गाभार्यायाला घाल रात्रीचे काजळ, माळ वेणीत चांदणे चंद्रकोरीची काकणे, दंवबिंदूंची पैंजणे सोनसळीचा पदर, सांजरंगाची पैठणी गर्भरेशमी आभाळशेला पांघर साजणी सूर्यकिरणांनी रेख भाळी कुंकवाची चिरी गळा नक्षत्रमण्यांची माळ खुलू दे साजिरी गो-या तळव्याला लाव चैत्रपालवीची मेंदी कर...