Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

श्री आर्यादुर्गा देवी महात्म्य संपूर्ण

Webdunia
बुधवार, 3 जानेवारी 2024 (12:29 IST)
स्कंद पुराणांत गोकर्ण महात्म्यमध्ये उत्तरखंडात " श्री आर्यादुर्गा महात्म्य " वर्णन केले आहे.

ALSO READ: आर्यादुर्गा देवी - अध्याय १
ALSO READ: आर्यादुर्गा देवी - अध्याय २
ALSO READ: आर्यादुर्गा देवी - अध्याय ३
ALSO READ: आर्यादुर्गा देवी - अध्याय ४
श्री आर्यादुर्गा देवीची आरती
जय देवी जय देवी जय आर्यादुर्गे श्री आर्यादुर्गे
भक्तांना ताराया धावत ये वेगे
जय देवी जय देवी...
 
दीन जनांनी स्मरता दैन्या तू हरसी।
तुझिया भक्तालागी दर्शन तू देसी।
अखिल चराचर विश्वामाजी तू वरसी।
दुष्ट जनांचे दुर्गे निर्दालन करिसी।।1।।
जय देवी जय देवी...
 
सद्भावाने तुजला जे कोणी भजती।
त्यांसी संतत संपद सौख्याला देसी।
दुर्धर आधि व्याधी त्यांची तू हरसी।
ऐसी करुणा मूर्ती विलस नव जगती।।2।।
जय देवी जय देवी...
 
स्वरुप कौमारी तू ब्रम्हचरीणी।
सकलही त्रैल्योक्याची होसी तू जननी।
सभोवताली तुझिया तेजोबल नामी।
भक्तांलागी वससी तू हसोळग्रामी।।3।।
जय देवी जय देवी...
 
दुर्गे सर्वांची तू कुलस्वामिनी होसी।
म्हणूनी आम्ही आलो तुझिया भेटीसी।
सज्जन संगत तैसी सद्बुद्धी देई।
इतुकी आर्यादर्गे विनंती तव पायी।।4।।
जय देवी जय देवी...
 
मार्गशीर्ष वहा अष्टमीच्या दिवशी।
भगिनी नवदुर्गा तव येते भेटिसी।
उत्सव उत्साहाने बह सकलही जन करती।
दास विनायक तरला तव गाऊनिया किर्ती।।5।।
जय देवी जय देवी जय आर्यादुर्गे श्री आर्यादुर्गे
भक्तांना ताराया धावत ये वेगे
जय देवी जय देवी...

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

Avoid on Wednesday बुधवारी ही कामे करु नये

आरती बुधवारची

Margashirsha 2024 मार्गशीर्ष महिन्यात काय करावे?

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

पुढील लेख
Show comments