महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील बालाघाट डोंगराजवळ जयवंती नदी तीरावर अंबाजोगाई या गावात श्री योगेश्वरी देवीचे तीर्थक्षेत्र आहे. हे क्षेत्र देवीचे मुळस्थान म्हणून ओळखले जाते. देवीच्या शक्तीपिठापैकी हे मुळपीठ म्हणून प्रसिद्ध आहे. श्री योगेश्वरी देवी कोकणवासीयांची कुलस्वामिनी व अंबाजोगाई वासियांचे ग्राम दैवत म्हणून देखील प्रसिद्ध आहे. श्री योगेश्वरी देवी मंदिर हे अनादिकालापासून असून देवीचा अवतार स्वयंभू असल्याचे सांगितले जाते. श्री योगेश्वरी देवी कुमारिका असूनदंतासुर नावाच्या राक्षसाचा वध करण्यासाठी मार्गशीष पौर्णिमेला अवतार घेतला आहे.