Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मोबाईल सॅनिटाईज करण्यापूर्वी नक्की वाचा

Webdunia
सोमवार, 7 सप्टेंबर 2020 (12:25 IST)
हल्ली हात स्वच्छ करण्यासाठी सतत सॅनिटायझर किंवा साबणाचा वापर करण्याचा सल्ला दिला जात आहे. कारण करोना संक्रमणापासून बचावासाठी हा एकमेव रामबाण उपाय आहे. पण मोबाईलला Disinfect करणे देखील तेवढेच गरजेचे आहे कारण वर्तमान काळात सतत हातात मोबाईल असणे आणि त्यानंतर कळत-नकळत ते हात आपल्या चेहरा किंवा डोळ्यांना स्पर्श होणे आरोग्यासाठी घातक सिद्ध होऊ शकतं.
 
मोबाइल स्वच्छ करण्यासाठी आपल्या या सामुग्रीची गरज भासेल-
 
सॉफ्ट कपडा, जसा की आपण चष्मा स्वच्छ करण्यासाठी वापरतो.
 
70 टक्क्यांहून अधिक आइसोप्रोपाइल अल्कोहल (याला रबिंग अल्कोहल देखील म्हणतात) किंवा इथेनॉलयुक्त उत्पाद.
 
सॅमसंगच्या वेबसाइट गाइडलाइंस प्रमाणे आपण 70% हून अधिक आइसोप्रोपाइल अल्कोहल वापरून मोबाइल फोन स्वच्छ करू शकता.
 
सर्वात आधी आपला मोबाइल स्वीच ऑफ करावा. नंतर कव्हर काढावं.
 
नरम कपड्याला आइसोप्रोफाइल अल्कोहलने जरा ओलसर करावं. अधिक किंवा गच्च ओलं करू नये याची काळजी घ्या.
 
आता या कपड्याने मोबाइल स्वच्छ करावा.
 
नंतर मोबाइल कव्हर देखील स्वच्छ करावं.
 
अल्कोहोल बेस्ड वाइप्स वापरून देखील मोबाइल सॅनिटाईज करता येऊ शकतो. 
 
मोबाइल सुकल्यानंतर ऑन करावा नाहीतर फोन खराब होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Ramayan : हनुमानजी आपली शक्ती का विसरले?

Kamada Ekadashi 2025: ८ एप्रिल रोजी कामदा एकादशी, तिथी मुहूर्त आणि व्रतकथा

आंघोळीच्या पाण्यात या 4 गोष्टी मिसळा, भरपूर पैसा मिळेल, प्रगती होईल !

उन्हाळ्यात दररोज एक कच्चा कांदा खा, उष्माघातापासून बचाव होईल, इतरही अनेक फायदे

गुलकंद करंजी रेसिपी

सर्व पहा

नवीन

KKR vs LSG Playing 11: कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनौ यांच्यातील सामन्यात नारायण आणि दिग्वेश यांच्यात लढत

PBKS vs CSK : पंजाब आपला दुसरा सामना घरच्या मैदानावर चेन्नई सुपर किंग्ज सोबत खेळेल

LIVE: शेअर बाजारातील घसरणीमुळे संजय राऊत संतापले

या तारखेला जमा होणार एप्रिलचा हप्ता

मुंबई लग्नाच्या दोन महिन्यांनंतरच २६ वर्षीय विवाहितेची आत्महत्या

पुढील लेख
Show comments